आंतरराष्ट्रीय

मोदी झुकणारे नाहीत : पुतीन यांनी केले कौतुक

भारताने रशियासोबतचे संबंध कमी करावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पाश्चात्त्य देशांकडून टाकला जाणारा दबाव जागतिक स्थिरतेला हानी पोहोचवणारा ठरेल, असे पुतिन यांनी म्हटले आहे. तसेच, भारताची आर्थिक प्रगती ही एकाएकी झालेली नसून, ती मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कठोर परिश्रमांचे फळ आहे, मोदी दबावासमोर झुकणारे नेते नाहीत, अशी कौतुकाची थापही त्यांनी दिली.

Swapnil S

सेंट पीटर्सबर्ग : भारत आणि रशिया यांच्यातील जुन्या व काळाच्या कसोटीवर उतरलेल्या संबंधांचे कौतुक करत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. भारताने रशियासोबतचे संबंध कमी करावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पाश्चात्त्य देशांकडून टाकला जाणारा दबाव जागतिक स्थिरतेला हानी पोहोचवणारा ठरेल, असे पुतिन यांनी म्हटले आहे. तसेच, भारताची आर्थिक प्रगती ही एकाएकी झालेली नसून, ती मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कठोर परिश्रमांचे फळ आहे, मोदी दबावासमोर झुकणारे नेते नाहीत, अशी कौतुकाची थापही त्यांनी दिली.

जगातील आघाडीच्या वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधताना पुतिन बोलत होते. यावेळी त्यांनी भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे विशेष कौतुक केले. रशिया भारतासोबतचे सर्वंकष संबंध वाढवण्यासाठी कटिबद्ध असून, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार सध्याच्या ६० अब्ज डॉलरवरून वार्षिक १०० अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार