PM
आंतरराष्ट्रीय

रशियाच्या हवाई हल्ल्यात किमान ५ ठार; रात्रभर युक्रेनवर क्षेपणास्त्र, ड्रोनचा मारा

रशियाने शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत युक्रेनवर ड्रोन, क्षेपणास्त्र हवाई हल्ला केला. या हल्ल्यात किमान पाच नागरिक ठार झाले आहेत, असे युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्यांचा उद्देश नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Swapnil S

कीव्ह : रशियाने शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत युक्रेनवर ड्रोन, क्षेपणास्त्र हवाई हल्ला केला. या हल्ल्यात किमान पाच नागरिक ठार झाले आहेत, असे युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्यांचा उद्देश नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी सकाळी सांगितले की, रशियाने युक्रेनमधील नऊ प्रदेशांवर ५० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि सुमारे ५०० ड्रोन डागले. लव्हिव प्रदेशात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या एकत्रित हल्ल्यात १५ वर्षीय मुलासह चार जणांचा मृत्यू झाला, असे प्रादेशिक अधिकारी आणि युक्रेनच्या आपत्कालीन सेवांनी सांगितले. पूर्वेकडील भागात चालू असलेल्या लढाईपासून सुरक्षित मानले जाणारे हे ऐतिहासिक पश्चिमेकडील शहर रविवारी सकाळी काही काळासाठी अंधारात बुडाले. या हल्ल्यात सहा लोक जखमी झाले असून दोन विभागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आणि सार्वजनिक वाहतूकही थांबली होती, असे महापौर आंद्रेई सादोवी यांनी सांगितले.

दरम्यान, दक्षिणेकडील झापोरिझझिया शहरात झालेल्या हवाई हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आणि मुलीसह नऊ जण जखमी झाले, असे प्रादेशिक राज्यपाल इव्हान फेदोरोव यांनी सांगितले. रशियाने ड्रोन आणि मार्गदर्शित हवाई बाँबद्वारे हल्ला केला. या हल्ल्यामुळे निवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या. या हल्ल्यामुळे झापोरिझझिया व आसपासच्या भागातील सुमारे ७३ हजार घरांचा वीजपुरवठा खंडित झाला.

दरम्यान, क्रेमलिनने पुन्हा एकदा युक्रेनच्या वीज ग्रीडवर हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. २४ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या संपूर्ण आक्रमणानंतर दरवर्षीप्रमाणेच हिवाळ्यापूर्वी नागरिकांना उष्णता, प्रकाश आणि पाणी नाकारून थंडीला “शस्त्र” बनवण्याचा रशियाने प्रयत्न केल्याचा युक्रेनचा आरोप आहे.

FICCI FRAMES 2025 : "सर, तुम्ही संत्री कशी खातात?"अक्षय कुमारचा फडणवीसांना मजेशीर सवाल; मुख्यमंत्र्यांनी दिलं 'ओजी नागपूरकर' उत्तर

'या वर्षी आनंदाचा शिधा नाही’; आर्थिक अडचणींचा हवाला देत महाराष्ट्र सरकारचा निर्णय

नवी मुंबई विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज; वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर

CJI अवमान प्रकरण : शरद पवार गटाचे संविधान सन्मान आंदोलन; रोहित पवार म्हणाले, ''मनुवादी प्रवृत्ती...

Thane : मेट्रो ९ मार्गिका १५ डिसेंबर, तर ३१ डिसेंबरपर्यंत मेट्रो ४ सुरू करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश