एक्स @TahirShah687
आंतरराष्ट्रीय

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी रणनीती आखणार; इंग्लंड, फ्रान्स, युक्रेनची मान्यता

गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला आहे.

Swapnil S

लंडन : गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला आहे. आता हे युद्ध थांबवण्यासाठी युरोपही सरसावला आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी रणनीती आखण्यास इंग्लंड, फ्रान्स व युक्रेनने मान्यता दिली आहे.

अमेरिकेचा दौरा आटोपून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की हे इंग्लंडमध्ये दाखल झाले. त्यांनी इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर व फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा केली.

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी ब्रिटन, फ्रान्स व युक्रेनने रणनीती आखण्याचे ठरवले आहे. ही रणनीती अमेरिकेसमोर सादर केली जाणार आहे. दरम्यान, इंग्लंडचे पंतप्रधान स्टार्मर यांनी लंडनमध्ये युक्रेनप्रकरणी तातडीने चर्चा करण्यासाठी युरोपातील नेत्यांची बैठक बोलावली होती. तत्पूर्वी, स्टार्मर व झेलेन्स्की यांची बैठक झाली. तुम्हाला संपूर्ण इंग्लंडचा पाठिंबा आहे, असे आश्वासन इंग्लंडचे पंतप्रधान स्टार्मर यांनी यावेळी झेलेन्स्की यांना दिले.

Mumbai : कृत्रिम फुलांना पसंतीची मोहोर; चिनी बनावटीच्या फुलांना पसंती, क्रॉफर्ड मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड

Mumbai : विद्यार्थ्यांनी घडवल्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती; ‘फ्री प्रेस हाऊस’मध्ये भरला नवकलाकारांचा मेळा

Mumbai : ब्रीच कँडीकरांचा ‘बीएमसी फुटपाथ रिपोर्ट कार्ड’; ‘कारवाईची नोंद व जबाबदारी निश्चित करा, रहिवाशांची मागणी

BRICS Summit 2026 : ‘ब्रिक्स’ साठी जिनपिंग दिल्लीत येणार

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रेसह इतरांवर न्यायालयात आरोपपत्र