Photo : X (@FroIndiaToWorld)
आंतरराष्ट्रीय

सर्जिओ गोर भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत; अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी त्यांचे निकटवर्तीय आणि व्हाईट हाऊसचे पर्सनल डायरेक्टर सर्जिओ गोर यांची भारतातील पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी त्यांचे निकटवर्तीय आणि व्हाईट हाऊसचे पर्सनल डायरेक्टर सर्जिओ गोर यांची भारतातील पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांच्यावर दक्षिण आणि मध्य आशियाई घडामोडींसाठी विशेष दूत म्हणूनही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गोर हे ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.

ट्रम्प यांनी 'टूथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, मी सर्जिओ गोर यांना भारताचे पुढील राजदूत आणि दक्षिण व मध्य आशियाई घडामोडींसाठी विशेष दूत म्हणून बढती देत आहे. सर्जिओ आणि त्यांच्या टीमने विक्रमी वेळेत आपल्या संघीय सरकारच्या प्रत्येक विभागात जवळपास ४,००० 'अमेरिका फर्स्ट' विचारांच्या देशभक्तांची नियुक्ती केली आहे.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग