शेख हसीना आणि मुलगा सजीब वाझेद 
आंतरराष्ट्रीय

Bangladesh : शेख हसीना यांना २१ वर्षांची शिक्षा, मुलगा आणि मुलीलाही ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

ढाका येथील एका न्यायालयाने जमीन घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणांमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांना एकूण २१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचप्रमाणे हसीना यांचा मुलगा आणि मुलीलाही प्रत्येकी ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. बांगलादेशच्या राजकारणात हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे.

Swapnil S

ढाका : ढाका येथील एका न्यायालयाने जमीन घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणांमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांना एकूण २१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचप्रमाणे हसीना यांचा मुलगा आणि मुलीलाही प्रत्येकी ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. बांगलादेशच्या राजकारणात हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. ढाका येथील विशेष न्यायाधीश-५ मोहम्मद अब्दुल्लाह अल मामून यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल गुरुवारी दिला. भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांखाली ही कारवाई झाली आहे. याआधीच, जुलै २०२४ च्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी 'मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी' क्राइम्स ट्रिब्यूनलने हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. देशातून पळून गेलेल्या हसीना यांच्या अडचणी आता प्रचंड वाढल्या आहेत.

मुलगा, मुलीलाही शिक्षा

या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात शेख हसीना यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही आरोपी बनवण्यात आले होते. शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय यांना न्यायालयाने ५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा आणि १ लाख टाका दंड ठोठावला आहे. तर, मुलगी सायमा वाजेद पुतुल यांनाही ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे, मात्र त्यांना कोणताही दंड ठोठावण्यात आलेला नाही.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग