Photo : X (@WhiteHouse) 
आंतरराष्ट्रीय

थायलंड-कंबोडियात शांतता करार; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या

थायलंड आणि कंबोडियाने युद्धविराम करून शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उपस्थित होते.

Swapnil S

क्वालांलपूर : थायलंड आणि कंबोडियाने युद्धविराम करून शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उपस्थित होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रविवारी सकाळी मलेशियाच्या दौऱ्यावर पोहोचले. येथे त्यांनी रेड कार्पेटवरक्वालांलपूर : थायलंड आणि कंबोडियाने युद्धविराम करून शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उपस्थित होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रविवारी सकाळी मलेशियाच्या दौऱ्यावर पोहोचले. येथे त्यांनी रेड कार्पेटवर स्थानिक कलाकारांसोबत नृत्यही केले.

ट्रम्प म्हणाले की, ज्याला लोक अशक्य मानत होते, ते मी शक्य करून दाखवले आहे. थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील मंदिर वादावरून पाच दिवस चाललेल्या युद्धात ४८ लोकांचा मृत्यू झाला होता. या संघर्षाच्या समाप्तीत ट्रम्प यांनी मोठी भूमिका बजावली.

क्वालालंपूर येथे पोहोचल्यावर मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत केले. ते आसियान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मलेशियात आले आहेत. ट्रम्प २०१७ नंतर प्रथमच या परिषदेत सहभागी झाले आहेत. आज ते मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प