

कल्याण : कल्याण शहर आणि कल्याण शहर आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना मंगळवारी (ता. २८) पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. बारावे आणि मोहिली येथील कच्चे पाणी उचलण्याच्या यंत्रणेत गाळ, माती व पालापाचोळा काढण्याचे काम सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत होणार आहे.
या काळात नागरिकांनी पाणी बचतीचा विशेष प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याच काळात विद्युत उपकरणांची देखभालही केली जाणार आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, चिंचपाडा, कैलासनगर, वालधुनी, विजयनगर, नेतिवली, चक्कीनाका, पत्रीपूल, लोकग्राम तसेच कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्ता, बेतुरकरपाडा, बिर्ला महाविद्यालय परिसर, खडकपाडा, पारनाका, दूधनाका, गोविंदवाडी, आधारवाडी, गंधारे, बारावे, शहाड, आंबिवली, मोहने, धाकटे शहाड, बंदरपाडा, अटाळी परिसर या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.