बँकॉक : थायलंडच्या घटनात्मक - न्यायालयाने बुधवारी पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना पदावरून हटवले. थाविसिन यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात तुरुंगात असलेल्या - माजी वकिलाची नियुक्ती - केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाच्या - निर्णयामुळे पद गमवावे लागणारे श्रेथा थाविसिन हे गेल्या १६ - वर्षांतील थायलंडचे चौथे पंतप्रधान - आहेत.
श्रेथा थाविसिन यांनी नैतिक निकषांची पूर्तता न करणाऱ्या मंत्र्याची नियुक्ती करून संविधानाचे उल्लंघन केले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. थाविसिन यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात तुरुंगात असलेल्या माजी वकिलाची नियुक्ती केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, - थायलंडचे विद्यमान उपपंतप्रधान फुमथम वेचाचाई हे कार्यवाहक - पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारतील, अशी शक्यता आहे.
मंत्रिमंडळही विसर्जित, नव्याने सरकार स्थापन होणार
न्यायालयाने आपल्या आदेशात, थायलंड सरकारचे मंत्रिमंडळही बरखास्त केले आहे. आता यानंतर पंतप्रधानांची नव्याने नियुक्ती होणार आहे. फेउ थाई पक्षाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडी आता पंतप्रधानपदासाठी नवीन नाव सुचवणार आहे. नव्या नावाची घोषणा करण्यासाठी थायलंडच्या ५०० सदस्यीय संसदेत मतदान होणार आहे.
घटनात्मक न्यायालयाच्या ९ न्यायाधीशांच्या खंडपीठाने ५-४ अशा बहुमताने हा निर्णय दिला आहे. माजी सिनेटर्सनी पंतप्रधान श्रेथा यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या निर्णयानंतर थायलंडमध्ये राजकीय संकट निर्माण झाले आहे.
श्रेथा थाविसिन यांनी शिनावात्रा यांचे माजी वकील पिचित चुएनबन यांची कॅबिनेट नियुक्ती कायम ठेवली. चुएनबन यांना न्यायालयीन कर्मचाऱ्यांना लाच देण्याच्या प्रकरणात २००८ मध्ये तुरुंगात टाकण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावरील लाचखोरीचा आरोप सिद्ध झाला नाही. असे असतानाही श्रेथा थाविसिन यांनी पिचित चुएनबन यांना मंत्रिमंडळ पदावर नियुक्त करून संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. घटनात्मक न्यायालयाने हा आरोप खरा मानला. थाविसिन यांना थायलंडचे पंतप्रधान होऊन एक वर्षही उलटले नव्हते. गेल्या दोन दशकांत सत्तापालट आणि न्यायालयीन निर्णयांमुळे अनेक सरकारे पडली. आता पुन्हा एकदा न्यायालयीन निर्णयामुळे देशात राजकीय अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. थायलंडच्या गोंधळाचा फटका थाविसिन यांच्या फेउ थाई पार्टीला सहन करावा लागत आहे.