लश्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर, कुख्यात दहशतवादी मौलाना काशिफ अलीचा खात्मा; अज्ञात दुचाकीस्वारांनी घातल्या गोळ्या  सौजन्य : (एक्स)
आंतरराष्ट्रीय

लश्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर, कुख्यात दहशतवादी मौलाना काशिफ अलीचा खात्मा; अज्ञात दुचाकीस्वारांनी घातल्या गोळ्या

पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) टॉप कमांडर, कुख्यात दहशतवादी मौलाना काशिफ अली (Maulana Kashif Ali) हा अज्ञात दुचाकीस्वाराने केलेल्या हल्ल्यात मारला गेला. काशिफ अली हा लश्कर-ए-तैयबाची राजकीय शाखा पीएमएमएल (Pakistan Markazi Muslim League - PMML) चा प्रमुख होता.

Kkhushi Niramish

पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) टॉप कमांडर, कुख्यात दहशतवादी मौलाना काशिफ अली (Maulana Kashif Ali) हा अज्ञात दुचाकीस्वाराने केलेल्या हल्ल्यात मारला गेला. काशिफ अली हा लश्कर-ए-तैयबाची राजकीय शाखा पीएमएमएल (Pakistan Markazi Muslim League - PMML) चा प्रमुख होता.

अली सोमवारी (दि.१७) खैबर पख्तूनख्वा प्रांतातील स्वाबी जिल्ह्यात त्याच्या घरी असताना अज्ञात दुचाकीस्वारांनी स्वयंचलित शस्त्राने त्याच्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या. काशिफ अलीवर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.

कोण होता काशिफ अली?

तो दहशतवादी हाफिज सईद याचा मेहुणा होता. पीएमएमएलची 2024 मध्ये हाफिज सईद याने स्थापना केली होती. भारतविरोधी दहशतवादी कारवाया करण्यात त्याचा सक्रिय सहभाग होता. काशिफ अली हा पाकिस्तानातील युवकांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देत होता. तसेच युवकांचा ब्रेन वॉश करून त्यांना दहशतवादी कारवायांसाठी प्रेरित करायचा. तो अनेक मशिदी आणि मदरशांचा प्रमुख होता. तो युवकांमध्ये जिहादी विचारांचा प्रचार करायचा. भारत विरोधी दहशतवादी कारवाया करण्यात त्याचा सक्रिय सहभाग असे. पाकिस्तानातील तरुणांच्या मनात भारत विरोधी भाषणे करून द्वेष निर्माण करत असे.

पाकिस्तानात खळबळ; सोशल मीडियावरून सरकारवर राग व्यक्त

या घटनेनंतर पाकिस्तानात खळबळ उडाली असून सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आणि सैन्य अधिकाऱ्यांवर देखील संताप व्यक्त होत आहे. अद्याप, पाकिस्तानकडून या घटनेवर कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

पाकिस्तानात महिन्याभरात लश्कर-ए-तैयबाच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा

पाकिस्तानात गेल्या महिन्याभरात लश्कर-ए-तैयबाचे तीन प्रमुख दहशतवादी मारले गेले आहे. यापैकी दोघेजण कथितपणे रस्ते अपघातात मारले गेले आहेत. त्यानंतर काशिफ अली गोळीबारात मारला गेला.

विघ्नहर्त्याचे राज्यात आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली; ट्रम्प यांचा नवा दावा, दोन्ही देशांमधील अणुयुद्ध थांबविल्याचाही पुनरुच्चार

सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे; संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई