भारतात येणाऱ्या इराणच्या विमानावर अमेरिकेचा हल्ला प्रातिनिधिक छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

भारतात येणाऱ्या इराणच्या विमानावर अमेरिकेचा हल्ला

अमेरिकेने इराणमधील मशहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात महान एअर या कंपनीचे एक नागरी विमान नष्ट झाले आहे. हे विमान युद्धग्रस्तांसाठी सामग्री नेण्यासाठी दिल्लीला येणार होते...

Swapnil S

तेहरान : अमेरिकेने इराणमधील मशहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात महान एअर या कंपनीचे एक नागरी विमान नष्ट झाले आहे. हे विमान युद्धग्रस्तांसाठी सामग्री नेण्यासाठी दिल्लीला येणार होते. या विमानातून युद्धग्रस्तांसाठी ११ टनांहून अधिक औषधे नेली जाणार होती अशी माहिती समोर आली आहे.

इराणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान दिल्लीतून मानवीय मदत घेऊन इराणला परत येणार होते. यात भारतीय नागरिकांनी इराणी नागरिकांसाठी जमा केलेल्या साहित्याचाही समावेश होते. मात्र, हे विमान दिल्लीला पोहोचण्याआधीच अमेरिकेने त्यावर हल्ला केला. इराणने याला मदत आणि मानवीय सहाय्यावर केलेला हल्ला असे म्हटले आहे. त्यामुळे आता इराणकडून दुसरे विमान मदत आणण्यासाठी पाठवले जाण्याची शक्यता आहे.

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी सरी; पुणे, पिंपरी - चिंचवड, वाशिममध्ये पाऊस; वातावरणात गारवा, पण शेतीचे नुकसान

Iran vs US-Israel War : ट्रम्प यांचा पुन्हा 'हल्लाबोल'; लवकर शांतता तह करा, अन्यथा, 'उद्ध्वस्त' करू- इराणला इशारा

नक्षलवाद संपवण्यासाठी काँग्रेसने काहीच केले नाही; नक्षलींना गोळीला गोळीनेच उत्तर देऊ; लोकसभेत शहा यांचा प्रहार

मित्र कोण, शत्रू कोण गणित साधे कळले नाही

आजचे राशिभविष्य, ३१ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत