चाबहार बंदर (इराण) X
आंतरराष्ट्रीय

Iran vs US-Israel War : इराणच्या चाबहार बंदरावर अमेरिकेचा मोठा हल्ला; भारताची चाबहारमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक

अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या १७ दिवसांपासून युद्ध सुरू असतानाच भारताने कोट्यवधी रुपयांची महागुंतवणूक केलेल्या इराणच्या चाबहार बंदरावर अमेरिकेने मोठा हल्ला केला आहे. अमेरिकन लढाऊ विमानांनी इराणच्या चाबहार व्यापार क्षेत्राजवळील एका डोंगरावर असलेल्या लष्करी तळांवर हल्ला केल्याचे वृत्त आहे.

Swapnil S

तेहरान : अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या १७ दिवसांपासून युद्ध सुरू असतानाच भारताने कोट्यवधी रुपयांची महागुंतवणूक केलेल्या इराणच्या चाबहार बंदरावर अमेरिकेने मोठा हल्ला केला आहे. अमेरिकन लढाऊ विमानांनी इराणच्या चाबहार व्यापार क्षेत्राजवळील एका डोंगरावर असलेल्या लष्करी तळांवर हल्ला केल्याचे वृत्त आहे.

खर्ग बेटानंतर अमेरिकेने इराणच्या चाबहार बंदरावर मोठा हल्ला केला. अमेरिकन लढाऊ विमानांनी व्यापार क्षेत्रातील लष्करी छावण्यांना लक्ष्य केले आहे. व्यापार क्षेत्रात स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. याशिवाय धुराचे प्रचंड लोटही दिसत होते. हल्ल्यांमुळे चाबहार बंदर परिसरात मोठे नुकसान झाल्याची भीती वर्तवली जात आहे. चाबहार बंदराजवळ झालेल्या हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अमेरिकन विमाने बंदराच्या व्यापार क्षेत्राजवळ घिरट्या घालत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

इराणचे चाबहार बंदर भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. पश्चिम आशिया आणि युरोपशी व्यापार करण्यासाठी भारत या बंदराचा वापर करतो. गेल्या अनेक वर्षांपासून भारत सरकारने या बंदराच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.

नाटो देशांकडून अमेरिकच्या आवाहनाला थंड प्रतिसाद

अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर, इराणने होर्मुझची सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात बंद केली आहे, ज्यामुळे अमेरिका आणखी संतापली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सांगितले की त्यांनी सामुद्रधुनी खुली ठेवण्यासाठी सुमारे सात देशांकडून युद्धनौका मागवल्या आहेत. तथापि, इराण युद्धादरम्यान तेलाच्या किमती वाढल्या असूनही, अद्याप कोणत्याही देशाने त्यांच्या आवाहनाला ठोस प्रतिसाद दिलेला नाही.

ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, जपानचा नकार

ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे की ते होर्मुझच्या सामुद्रधुनीत त्यांच्या युद्धनौका पाठवणार नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या वाहतूक मंत्री कॅथरीन किंग यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ऑस्ट्रेलियाने त्यांच्या योगदानाबद्दल आधीच स्पष्ट केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, संयुक्त अरब अमिरातीत ऑस्ट्रेलियाचे नागरिक मोठ्या प्रमाणावर असल्याने मदत करण्यासाठी विमाने पुरवली जात आहेत. किंग म्हणाले, पण आम्ही होर्मुझच्या सामुद्रधुनीत कोणतेही जहाज पाठवणार नाही. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी ट्रम्प यांनी चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया,यूके आणि फ्रान्सला युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीत पाठवण्याचं आवाहन केले होते. मात्र, ट्रम्प यांच्या आवाहनाला जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाने ठेंगा दाखवला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची नाटो देशांनाही धमकी

जर मित्र राष्ट्रांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्यास मदत केली नाही तर नाटोचे भविष्य भयानक असू शकते, अशी धमकी आता ट्रम्प यांनी नाटो देशांना दिली आहे. ट्रम्प म्हणाले, आमच्याकडे नाटो नावाची एक व्यवस्था आहे. आम्ही त्यांच्याशी खूप चांगले वागलो आहोत. आम्ही त्यांना मदत केली आहे त्यामुळे आता ते आम्हाला मदत करतील का ते आम्ही पाहू. नाटो जगातील सर्वात मोठी लष्करी युती आहे. २०२६ च्या सद्यस्थितीनुसार, नाटोमध्ये एकूण ३२ सदस्य देश आहेत. कलम ५ अन्वये या देशांनी एकमेकांच्या संरक्षणाची शपथ घेतली आहे.

चीनलाही इशारा

जर चीनने होर्मुझची सामुद्रधुनी उघडी ठेवण्यास मदत केली नाही तर ते या महिन्याच्या अखेरीस चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतची शिखर परिषद पुढे ढकलू शकतात. ट्रम्प ३१ मार्च रोजी चीनला भेट देणार आहेत. ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी वापरणाऱ्या देशांकडे या मार्गाचे संरक्षण करण्यासाठी युद्धनौका आणि आवश्यक मदत पाठवावी अशी मागणी केली होती.

यूएईकडून १९ भारतीयांना अटक

अबू धाबी : मध्य पूर्वमध्ये चालू संघर्षादरम्यान तणावाशी संबंधित बनावट फुटेज आणि कथा प्रसारित करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअऱ केल्याच्या आरोपाखाली यूएईने १९ भारतीयांसह ३५ जणांना अटक केली आहे. ही कारवाई दोन भागांमध्ये करण्यात आली आहे.

यूएईचे अॅटर्नी जनरल डॉ. हमाद सैफ अल शम्सी यांनी १५ मार्च रोजी विविध राष्ट्रीयत्वाच्या २५ लोकांना अटक करण्याचे आदेश दिले होते. एवढेच नाही तर त्यांच्यावर जलदगतीने खटला चालवण्याचे आदेशही देण्यात आले आहे. या २५ लोकांमध्ये १७ भारतीयांचा समावेश आहे. तर शनिवारी अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन भारतीयांसह अन्य देशांमधील १० जणांचा समावेश आहे.

२२ जहाजे, ६११ खलाशी

दरम्यान, पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणच्या सर्वोच्च नेत्याचे भारतातील प्रतिनिधी अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी भारतीय जहाजांना धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली जाईल, असा पुनरुच्चार केला. आता पर्शियन आखातात २२ भारतीय ध्वजधारी जहाजे शिल्लक आहेत, ज्यात एकूण ६११ खलाशी आहेत.

इराणशी झालेल्या चर्चेचे जयशंकर यांनी केले कौतुक

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणशी अलिकडेच झालेल्या चर्चेचे कौतुक केले आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे सांगितले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दोन भारतीय ध्वजधारी जहाजांना जाण्याची परवानगी दिल्यानंतर काही दिवसांनी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी तेहरानशी झालेल्या थेट चर्चेचे कौतुक केले आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे पुन्हा सुरू करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे सांगितले.

प्रत्येक जहाज स्वतंत्रपणे या महत्त्वाच्या जलमार्गावरून प्रवास करत होते आणि या संदर्भात इराणशी कोणताही ‘ब्लँकेट करार’नव्हता. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, ‘ताच्या ध्वजांकित जहाजांच्या प्रवासाच्या बदल्यात इराणला काहीही मिळाले ’. इराणने दोन भारतीय ध्वजधारी एलपीजी वाहकांना होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची परवानगी दिल्यानंतर काही दिवसांनी एस जयशंकर यांचे हे विधान आले. इराणने दोन भारतीय ध्वजधारी एलपीजी वाहक जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची परवानगी दिल्यानंतर काही दिवसांनी एस जयशंकर यांचे हे विधान आले. जयशंकर म्हणाले की, इराणी अधिकाऱ्यांशी झालेल्या त्यांच्या चर्चेचे निकाल लागले आहेत आणि संवाद सुरूच आहे. "जर माझ्यासाठी निकाल येत असेल तर मी स्वाभाविकपणे त्याकडे पाहत राहीन. तसेच’ भारतीय ध्वज असलेल्या अनेक जहाजांनी अद्याप सामुद्रधुनी ओलांडलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पहिले एलपीजीवाहक जहाज 'शिवालिक' मुंद्रा बंदरात दाखल

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, 'शिवालिक' हे एलपीजी वाहक जहाज कतारहून वायूचा साठा घेऊन भारतात दाखल झाले आहे. हे जहाज सोमवारी सायंकाळी ५ वाजता गुजरातच्या मुंद्रा बंदरावर पोहोचले. 'शिवालिक'वर सुमारे ४६,००० मेट्रिक टन एलपीजीचा साठा भरलेला असून ही मात्रा साधारणपणे ३२.४ लाख (३.२४ दशलक्ष) घरगुती गॅस सिलिंडर्सच्या समतुल्य असल्याचे सांगितले जात आहे. या जहाजाने १४ मार्च रोजी 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' ओलांडले होते आणि ते भारताच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या काळात, भारतात दाखल होणारे हे पहिलेच एलपीजी वाहक जहाज आहे. नौवहन मंत्रालयाच्या माहितीनुसार, 'नंदा देवी' नावाचे आणखी एक जहाज सुमारे ४६,००० टन एलपीजी घेऊन भारताच्या दिशेने येत असून, ते मंगळवारी भारतात दाखल होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, 'जग लाडकी' हे जहाज सुमारे ८१,००० टन 'मुर्बान क्रूड ऑइल'चा साठा घेऊन भारताच्या दिशेने येत असून, तेही उद्या मुंद्रा बंदरावर पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

Mumbai : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा अन् नववर्षाचा जल्लोष; मुंबई, ठाणे, डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रा

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

Mumbai : विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वेची धडक कारवाई! घाटकोपर स्थानकात ३९५ प्रवाशांना दणका, १ लाखांहून अधिक दंड वसूल

चॉकलेटमध्ये काचेचा तुकडा; स्विगीच्या NOICE ब्रँडवर आरोप, कंपनीची पहिली प्रतिक्रिया समोर

Nagpur : मॅट्रिमोनियल साईटवरील ओळख महागात पडली; मॉर्फ अश्लील व्हिडिओने ३६ वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल