तुम्हीही कॉफी लव्हर आहात का? मग हे ५ प्रकार तुमच्यासाठीच! 
लाईफस्टाईल

तुम्हीही कॉफी लव्हर आहात? मग हे ५ प्रकार तुमच्यासाठीच!

सकाळची सुरुवात कॉफीशिवाय होत नाही, असं अनेकांचं म्हणणं असतं. काहींसाठी कॉफी म्हणजे कामाचा उत्साह, तर काहींसाठी ती म्हणजे शांत क्षणांची सोबत. पण रोज तीच साधी कॉफी पिण्यापेक्षा थोडा बदल केला, तर चवही बदलते आणि मूडही!

Mayuri Gawade

सकाळची सुरुवात कॉफीशिवाय होत नाही, असं अनेकांचं म्हणणं असतं. काहींसाठी कॉफी म्हणजे कामाचा उत्साह, तर काहींसाठी ती म्हणजे शांत क्षणांची सोबत. पण रोज तीच साधी कॉफी पिण्यापेक्षा थोडा बदल केला, तर चवही बदलते आणि मूडही! कॉफीचे प्रकार अनेक आहेत. प्रत्येक प्रकाराची चव, टेक्स्चर आणि अनुभव वेगळा असतो. चला तर मग, पाहूया ५ सोप्या आणि खास कॉफी प्रकारांविषयी...

क्लासिक मिल्क कॉफी - सवयीची, पण समाधान देणारी

दूध गरम करून त्यात कॉफी पावडर आणि साखर मिसळा. दूध फार घट्ट किंवा फार पातळ ठेवू नका.
ही रोजच्या वापरासाठी उत्तम. हलकी, संतुलित आणि आराम देणारी कॉफी.

फेटलेली कॉफी - फेसाळ आणि क्रीमी

कपात कॉफी पावडर, साखर आणि थोडं गरम पाणी घ्या. चमच्याने जोरात फेटा. मिश्रण क्रीमसारखं झाल्यावर त्यावर गरम दूध घाला.
यामुळे कॉफीला नैसर्गिक फेस येतो आणि चव अधिक रिच होते.

दालगोना कॉफी - दिसायलाही खास

कॉफी पावडर, साखर आणि गरम पाणी समान प्रमाणात घेऊन फेटा. घट्ट फेस तयार झाल्यावर ते गरम किंवा थंड दुधावर घाला.
ही कॉफी दुधावर तरंगते आणि प्रत्येक घोटात क्रीमी आणि स्ट्राँग चव देते. घरबसल्या कॅफेचा अनुभव!

ब्लॅक कॉफी - साधी पण दमदार

एका कप गरम पाण्यात १ चमचा कॉफी पावडर मिसळा. हवे असल्यास थोडी साखर घालू शकता.
दूध नसल्यामुळे ही हलकी पण स्ट्राँग असते. एनर्जी वाढवण्यासाठी योग्य पर्याय.

क्रीमी मिल्क कोल्ड कॉफी - गार आणि फ्रेश

दुधात थोडी क्रीम घालून फेटा. त्यात कॉफी पावडर मिसळा. बर्फ घालून पुन्हा ब्लेंड करा. हवे असल्यास चॉकलेट सिरपही घालू शकता.
उन्हाळ्यासाठी बेस्ट आणि ताजेतवाने करणारी कॉफी.

कॉफी फक्त चवीसाठी नाही, तर ती अनुभवासाठी असते. कधी हलकी, कधी कडू, कधी फेसाळ, तर कधी गार. रोज तीच कॉफी पिण्याऐवजी प्रकार बदला… मूड आपोआप बदलेल!

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी

Mumbai : धक्कादायक! SNDT कॉलेजच्या कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; पुण्यातील घटनेचा VIDEO व्हायरल

Thane : 'स्वस्त घर' आणि शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २.९७ कोटींची फसवणूक; तिघांविरोधात तक्रार

मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण