मुलांसाठी बनवा प्रोटीनने भरलेली चणे‑शेंगदाण्याची चिक्की, इतकी चविष्ट की मुलं चॉकलेट विसरतील

मुलं दिवसभर शाळा, खेळ, क्लासेस आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटी करून खूप ऊर्जा खर्च करतात. अशावेळी त्यांच्या शरीराला प्रोटीनची गरज असते, पौष्टिक स्नॅक्स हवा असतो. अशा परिस्थितीत घरची प्रोटीनने भरलेली चणे-शेंगदाण्याची चिक्की एकदम परफेक्ट पर्याय ठरते.
मुलांसाठी बनवा प्रोटीनने भरलेली चणे‑शेंगदाण्याची चिक्की, इतकी चविष्ट की मुलं चॉकलेट विसरतील
मुलांसाठी बनवा प्रोटीनने भरलेली चणे‑शेंगदाण्याची चिक्की, इतकी चविष्ट की मुलं चॉकलेट विसरतील 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

मुलं दिवसभर शाळा, खेळ, क्लासेस आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटी करून खूप ऊर्जा खर्च करतात. अशावेळी त्यांच्या शरीराला प्रोटीनची गरज असते, पौष्टिक स्नॅक्स हवा असतो. अशा परिस्थितीत घरची प्रोटीनने भरलेली चणे-शेंगदाण्याची चिक्की एकदम परफेक्ट पर्याय ठरते. विशेष म्हणजे चणे वापरून बनवलेली चिक्की प्रोटीन, फायबर आणि मिनरल्सने भरलेली असते. त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी ही चिक्की हेल्दी स्नॅक म्हणून परफेक्ट आहे.

साहित्य

  • चणे - १ कप (उकडून, सुकवलेले)

  • शेंगदाणे - १/२ कप

मुलांसाठी बनवा प्रोटीनने भरलेली चणे‑शेंगदाण्याची चिक्की, इतकी चविष्ट की मुलं चॉकलेट विसरतील
महागड्या सप्लिमेंट्सना रामराम! खिशाला परवडणाऱ्या शाकाहारी फूड कॉम्बिनेशन्समधून मिळवा भरपूर प्रोटीन
  • तीळ - २ टेबलस्पून

  • ड्राय फ्रूट्स (ऐच्छिक) - २ टेबलस्पून

  • भोपळ्याच्या बिया (ऐच्छिक) - १ टेबलस्पून

  • तूप - १ टेबलस्पून

  • गूळ - १/२ कप (किसलेला)

  • वेलची पूड - १/४ चमचा

कृती

सर्वप्रथम चणे, शेंगदाणे, तीळ, ड्राय फ्रूट्स आणि भोपळ्याच्या बिया थोड्या तुपात मस्त परतून घ्या. भाजल्यावर थोडे थंड करून जाडसर कुटा; मिक्सरमध्ये वाटू नका, फक्त तुकडे करणे पुरेसे आहे. दुसऱ्या कढईत थोडे तूप घालून त्यात किसलेला गूळ वितळवून हलका फेस येईपर्यंत गरम करा. त्यात वेलची पावडर टाका आणि लगेच कुटलेले सर्व पदार्थ मिसळा, सर्व घटक एकजीव होण्यासाठी हलके हलवा. मिश्रण थोडे कोमट असतानाच तुप लावलेल्या थाळीत ओता आणि हाताने थापून घ्या. गरम असतानाच सुरीने हवे त्या आकारात कापून ठेवा. चिक्की पूर्ण थंड झाल्यावर घट्ट होते आणि तुकडे सहज पडतात. हवे असल्यास साठवून ठेवा आणि मुलांसह संध्याकाळच्या चहा सोबत किंवा नाश्त्यासाठी आनंदाने खा.

मुलांसाठी बनवा प्रोटीनने भरलेली चणे‑शेंगदाण्याची चिक्की, इतकी चविष्ट की मुलं चॉकलेट विसरतील
घरी केलेले मंच्युरियन दगडासारखे होतायत? 'या' सोप्या ट्रिक्स फॉलो करा आणि बनवा परफेक्ट मंच्युरियन

टीप्स:

  • चणे आणि शेंगदाण्यांमधील प्रोटीन स्नायूंसाठी फायदेशीर आहे.

  • तीळ आणि ड्रायफ्रूट्स हाडे आणि मेंदूसाठी उपयुक्त ठरतात.

  • गूळ नैसर्गिक ऊर्जा देतो आणि लोहाची कमतरता भरून काढतो.

  • मुलांसाठी मधल्या वेळेत खाऊ म्हणून देऊ शकता किंवा संध्याकाळच्या चहासोबत खायला परफेक्ट ठरेल.

logo
marathi.freepressjournal.in