महागड्या सप्लिमेंट्सना रामराम! खिशाला परवडणाऱ्या शाकाहारी फूड कॉम्बिनेशन्समधून मिळवा भरपूर प्रोटीन

"शाकाहारी आहारातून पुरेसं प्रोटीन मिळत नाही" असा समज अनेकांचा असतो. मात्र, डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ सांगतात की योग्य पदार्थ योग्य पद्धतीने एकत्र खाल्ले, तर शाकाहारी आहारातूनही शरीराची प्रोटीनची गरज सहज भागू शकते.
महागड्या सप्लिमेंट्सना रामराम! खिशाला परवडणाऱ्या शाकाहारी फूड कॉम्बिनेशन्समधून मिळवा भरपूर प्रोटीन
Published on

आजच्या धावपळीच्या जीवनात थकवा, कमजोरी, स्नायू दुखणं, केस गळणं किंवा वजन झपाट्याने कमी होणं अशा तक्रारी अनेक शाकाहारी लोकांमध्ये दिसून येतात. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरात प्रोटीनची कमतरता. "शाकाहारी आहारातून पुरेसं प्रोटीन मिळत नाही" असा समज अनेकांचा असतो. मात्र, डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ सांगतात की योग्य पदार्थ योग्य पद्धतीने एकत्र खाल्ले, तर शाकाहारी आहारातूनही शरीराची प्रोटीनची गरज सहज भागू शकते. त्यासाठी काही सोपी, देशी आणि खिशाला परवडणारी फूड कॉम्बिनेशन्स फारच उपयुक्त ठरतात.

शाकाहारी लोकांसाठी भरपूर प्रोटीन देणारे प्रभावी फूड कॉम्बिनेशन्स

१) वरण + भात
साधं वरण-भात हे कॉम्बिनेशन प्रोटीनच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे. डाळीतलं प्रोटीन आणि भातातील कार्बोहायड्रेट एकत्र येऊन शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात. आजारी व्यक्तींसाठी आणि लहान मुलांसाठी हा आहार उत्तम मानला जातो.

२)खिचडी (डाळ + तांदूळ + भाज्या)
डॉक्टरांच्या मते, खिचडी हा प्रोटीनचा सुपर स्रोत आहे. त्यात भाज्या आणि थोडं तूप घातल्यास तिचं पौष्टिक मूल्य आणखी वाढतं. आजारपणानंतर शरीर सावरण्यासाठी खिचडी सर्वोत्तम आहार मानला जातो.

३) हरभऱ्याची डाळ + गव्हाची पोळी
हरभऱ्याची डाळ आणि पोळी एकत्र खाल्ल्याने शरीराला जवळपास सर्व आवश्यक अमिनो ॲसिड्स मिळतात. त्यामुळे स्नायू मजबूत राहतात आणि थकवा कमी होतो. रोजच्या जेवणात हा पर्याय सहज समाविष्ट करता येतो.

४) उडीद डाळ + तांदूळ (इडली-सांबार)
उडीद डाळ आणि तांदूळ यांचं कॉम्बिनेशन हे प्रोटीनसाठी अत्यंत उत्तम मानलं जातं. इडली-सांबारसारखा हलका आणि पचायला सोपा आहार शरीराला दर्जेदार प्रोटीन देतो. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी हा पर्याय उत्तम ठरतो.

महागड्या सप्लिमेंट्सना रामराम! खिशाला परवडणाऱ्या शाकाहारी फूड कॉम्बिनेशन्समधून मिळवा भरपूर प्रोटीन
केस गळतात? महागड्या हेअर ट्रीटमेंट सोडा, 'शेपू' खा! ऋजुता दिवेकरने सांगितले भन्नाट फायदे

५) राजमा + तांदूळ (राजमा चावल)
राजमा चावल हे उत्तर भारतात लोकप्रिय असलेलं प्रोटीनयुक्त कॉम्बिनेशन आहे. यात प्रोटीनसोबतच लोह आणि फायबरही भरपूर प्रमाणात मिळतं. त्यामुळे पचन सुधारतं आणि ॲनिमियाचा धोका कमी होतो.

६) मूग डाळ + बाजरीची भाकरी
मूग डाळ आणि बाजरी एकत्र खाल्ल्याने लायसिन आणि मेथिओनाईन हे आवश्यक अमिनो ॲसिड्स मिळतात. हे कॉम्बिनेशन पचनासाठी हलकं असून शरीराला ऊर्जा देतं. वजन नियंत्रणात ठेवायचं असेल, तर हा पर्याय विशेष फायदेशीर ठरतो.

महागड्या सप्लिमेंट्सना रामराम! खिशाला परवडणाऱ्या शाकाहारी फूड कॉम्बिनेशन्समधून मिळवा भरपूर प्रोटीन
वॉटर प्युरिफायर लावला म्हणजे पाणी शुद्ध येतं असं वाटतं? कदाचित तुम्हीही करता 'या' चुका

७) मसूर डाळ + गव्हाची पोळी
मसूर डाळ आणि पोळी हे कॉम्बिनेशन शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी उपयुक्त आहे. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठीही हा पर्याय सुरक्षित मानला जातो.

शाकाहारी आहार घेत असतानाही योग्य फूड कॉम्बिनेशन्स निवडल्यास शरीरात प्रोटीनची कमतरता सहज भरून निघू शकते. महागड्या सप्लिमेंट्सपेक्षा हे देशी, सोपे आणि खिशाला परवडणारे पर्याय आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात. रोजच्या आहारात थोडासा बदल करून तुम्ही तुमचं आरोग्य अधिक मजबूत करू शकता.

(Disclaimer : ही माहिती 'yogawithengineer' या इंस्टाग्राम पेजवर अभ्यासकांकडून शेअर करण्यात आली आहे. याची नवशक्ती पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in