लाईफस्टाईल

नाश्त्याला झटपट आणि चविष्ट पर्याय; नेहमीच्या पोह्यांपेक्षा बनवा खमंग 'मसाला पोहे'

नेहमीचे कांदे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कमी वेळात तयार होणारे, हलके आणि चवीला लज्जतदार मसाला पोहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील. जाणून घ्या रेसिपी.

किशोरी घायवट-उबाळे

सकाळी घाई-घाईत पोटभर आणि पौष्टिक नाश्ता हवा असेल, तर घराघरात आवडीने खाल्ले जाणारे पोहे हा उत्तम पर्याय ठरतो. पण नेहमीचे कांदे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कमी वेळात तयार होणारे, हलके आणि चवीला लज्जतदार मसाला पोहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील. योग्य मसाले आणि खमंग फोडणीमुळे मसाला पोह्यांची चव आणखी वाढेल. जाणून घ्या सोपी रेसिपी.

साहित्य :

  • पोहे - २ वाट्या

  • कांदा - १ मध्यम (बारीक चिरलेला)

  • बटाटा - १ मध्यम (लहान चौकोनात कापलेला)

  • हिरवी मिरची - १ ते २ (बारीक चिरलेली)

  • मोहरी - १ चमचा

  • जिरे - अर्धा चमचा

  • कढीपत्ता - ८ ते १० पाने

  • हळद - अर्धा चमचा

  • लाल तिखट - अर्धा चमचा

  • धणेपूड - अर्धा चमचा

  • मीठ - चवीनुसार

  • साखर - चिमूटभर

  • तेल - २ चमचे

  • शेंगदाणे - २ चमचे

  • कोथिंबीर - सजावटीसाठी

  • लिंबाचा रस - १ चमचा

कृती :

  • सर्वप्रथम पोहे चाळणीत घेऊन पाण्याखाली धुवा. पाणी निथळू द्या आणि पोहे मऊ होण्यासाठी बाजूला ठेवा. पोहे जास्त वेळ भिजवू नका.

  • कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर जिरे, शेंगदाणे आणि कढीपत्ता घाला. शेंगदाणे कुरकुरीत झाल्यावर कांदा व हिरवी मिरची घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परता.

  • यानंतर बटाटा घालून झाकण ठेवून तो मऊ होईपर्यंत शिजवा. आता हळद, लाल तिखट, धणेपूड आणि मीठ घालून सर्व मसाले नीट परतून घ्या.

  • शेवटी भिजवलेले पोहे कढईत घालून हलक्या हाताने मिसळा. गरज असल्यास थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे वाफ द्या.

  • गॅस बंद करून वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला. गरमागरम मसाला पोहे सर्व्ह करा.

चव वाढवण्यासाठी खास टिप्स

  • फक्त कांद्याऐवजी कांदा-टोमॅटो पोहेही करता येतात.

  • पोह्यांवर शेव, भाजलेले शेंगदाणे किंवा नारळाचा किस घातल्यास त्यांची चव वाढते.

सातारा जिल्ह्यात ५७, तर पुणे जिल्ह्यात २३२ मतदान केंद्रे; पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी उद्या मतदान

ठाणे-भिवंडीत पाणी कपातीचे संकट; ठाण्यात आजपासून ३६ तास, तर भिवंडीत दर बुधवारी १८ तास पाणीपुरवठा बंद

Cyber Fraud Alert : तुम्हालाही व्हॉट्सॲपवर लग्नपत्रिका आलीय? सावधान... APK फाइलमुळे क्षणात खातं होईल रिकामं

दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी ५ जणांवर गुन्हा, सहलीत निष्काळजीपणा; पुण्यातील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

डेटा लीकप्रकरणी HDFC बँक अधिकाऱ्यांची चौकशी