लाईफस्टाईल

नॉनव्हेज लव्हर्ससाठी मसालेदार अंडा घोटाळा; घरीच बनवा स्ट्रीट फूड स्टाइल टेस्टी डिश

तव्यावर बनवलेले फ्राईड अंडे आणि बटरमध्ये टोस्ट केलेला पाव यामुळे या रेसिपीची चव आणखी वाढते. चला तर मग जाणून घेऊया, मुंबई स्टाइल अंडा घोटाळा बनवण्याची सोपी रेसिपी.

किशोरी घायवट-उबाळे

नॉन व्हेज खाण्याची इच्छा झाली तर अशा वेळी मुंबईच्या स्ट्रीट फूडमधील प्रसिद्ध 'अंडा घोटाळा' ही रेसिपी उत्तम पर्याय ठरू शकते. बटरमध्ये परतलेला कांदा, लसूण, मसाले आणि उकडलेली अंडी यांचा जबरदस्त संगम असलेली ही डिश खायला खूपच झणझणीत आणि चवदार लागते. तव्यावर बनवलेले फ्राईड अंडे आणि बटरमध्ये टोस्ट केलेला पाव यामुळे या रेसिपीची चव आणखी वाढते. चला तर मग जाणून घेऊया, मुंबई स्टाइल अंडा घोटाळा बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य :

  • उकडलेली अंडी (सोललेली) - ८

  • कच्ची अंडी - ४

  • बटर (शिजवण्यासाठी) - आवडीनुसार

  • मध्यम आकाराचे कांदे - ४

  • हिरव्या लसणाचे देठ - २४ ते ३२

  • हिरवी मिरची पेस्ट - ४ टीस्पून

  • हळद - १ टीस्पून

  • धणे पूड - ४ टीस्पून

  • गरम मसाला - २ टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • पाव - ८

  • तेल - ४ टीस्पून

  • भुरभुरण्यासाठी लाल तिखट

कृती :

सर्वप्रथम कांदे आणि हिरव्या लसणाचे देठ बारीक चिरून घ्या. तव्यावर २ ते ३ टेबलस्पून बटर गरम करा. त्यात चिरलेला कांदा आणि हिरवा लसूण घालून २ ते ३ मिनिटे परतून घ्या. आता त्यात १ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, अर्धा टीस्पून हळद, १ टीस्पून धणे पूड आणि अर्धा टीस्पून गरम मसाला घालून नीट मिक्स करा. त्यात २ उकडलेली अंडी थेट किसून घाला. चवीनुसार मीठ घालून २ ते ३ टेबलस्पून पाणी शिंपडा आणि मॅशरने छान मॅश करा. तयार झालेले मिश्रण सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून ठेवा.

त्यानंतर, त्याच तव्यावर थोडे बटर घालून २ पाव कुरकुरीत होईपर्यंत टोस्ट करून घ्या. पुन्हा तव्यावर तेल गरम करा आणि त्यात १ कच्चा अंडा फोडा. वरून थोडे लाल तिखट भुरभुरवा आणि १ मिनिट शिजवा. हा फ्राईड अंडा तयार केलेल्या अंड्याच्या मिश्रणावर ठेवा आणि गरमागरम बटर टोस्ट पावसोबत सर्व्ह करा.

टिप्स :

  • हिरवा लसूण मिळाला नाही तर साधा लसूण आणि कोथिंबीर वापरू शकता.

  • जास्त चव हवी असेल तर शेवटी थोडे बटर किंवा पावभाजी मसाला घालू शकता.

  • स्ट्रीट फूडसारखी चव यावी यासाठी अंडी चांगली मॅश करून मसाल्यात मिसळा.

  • सर्व्ह करताना वरून कोथिंबीर आणि बटरचा छोटा तुकडा घातल्यास चव आणखी वाढते.

CJP Protest : 'अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन चालवण्याचा पोलिसांना अधिकार'; RAF च्या दारुगोळा वापराच्या नोंदी जतन करा - SC

'तुम्ही पतंजलीवर लक्ष द्या नाहीतर बंद पडेल'; रामदेव बाबांना अभिजीत दिपकेंचे प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याचे बनावट पत्र व्हायरल; PIB चा खुलासा

Mumbai : अटल सेतूवर चुकीच्या दिशेने दुचाकी चालवण्याचा स्टंट; व्हिडीओ व्हायरल होताच रायडरविरोधात FIR दाखल

तोरणमाळच्या झिपलाईनवर जीव टांगणीला! ३,५०० फूट दरीवर अडकला पर्यटक; थरार पाहून धडकी भरेल, बघा Video