लाईफस्टाईल

सारीच्या सारी वैयक्तिक माहिती जाईल स्कॅमरच्या हाती; खतरनाक ‘APK Scam’ करेल तुमचा मोबाईल हॅक

‘मोबाईल ॲप्लिकेशन APK Scam’ म्हणजे तुमच्या फोनमध्ये अँन्ड्रॉईड पॅकेज कीट (एपीके) फाइलद्वारे मालवेअर किंवा तत्सम ॲप डाऊनलोड करून केली जाणारी फसवणूक. हे ॲप तुमच्या नकळत तुमची माहिती चोरू शकतात अथवा तुमच्या बँकेतून पैसे काढू शकतात.

रवींद्र राऊळ

मुंबई : ‘मोबाईल ॲप्लिकेशन एपीके स्कॅम’ म्हणजे तुमच्या फोनमध्ये अँन्ड्रॉईड पॅकेज कीट (एपीके) फाइलद्वारे मालवेअर किंवा तत्सम ॲप डाऊनलोड करून केली जाणारी फसवणूक. हे ॲप तुमच्या नकळत तुमची माहिती चोरू शकतात अथवा तुमच्या बँकेतून पैसे काढू शकतात.

एका अज्ञात व्यक्तीने सरकारी कर्मचाऱ्याला फोन करून आपण बँक रिलेशन मॅनेजर असल्याचे सांगत चुकीचा पत्ता दुरुस्त करण्यासाठी एपीके फाईल पाठवत डाऊनलोड करण्यास सांगितली. ती डाऊनलोड करताच बँक खात्यातील तब्बल चार लाख रुपये गायब झाले. ‘एपीके स्कॅम’ ॲप इन्स्टॉल करण्यासाठी अँन्ड्रॉईड सिस्टिम वापरते. कुणी गुगल प्ले स्टोअरव्यतिरिक्त इतर ठिकाणच्या एपीके फाइल डाऊनलोड करत असल्यास ते अडचणीत येऊ शकतात. स्कॅमर्स अशाप्रकारे बनावट ‘एपीके’ फाइल डाऊनलोड करतात ज्यात मालवेयर किंवा व्हायरस लपवलेले असतात. स्कॅमर्स लोकप्रिय ॲपसारखे दिसणारे बनावट ‘एपीके’ तयार करतात. ते तुम्हाला आकर्षक ऑफर किंवा माहिती पाठवून ते एपीके डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करतात. बरेचदा तुमच्या बँकेचे किंवा इतर ॲपचे अपडेट्स असल्याचे भासवून ते तुम्हाला फसवतात आणि एपीके इन्स्टॉल करायला लावतात. एकदा का तुम्ही ते एपीके इन्स्टॉल केले की ते तुमच्या फोनमधील की लॉगर, पासवर्ड आणि वैयक्तिक संदेश यासारखी माहिती चोरू शकतात किंवा तुमच्या बँकेतून पैसे काढू शकतात.

काय कराल?

  • अधिकृत स्टोअर्सवरून डाऊनलोड करा : नेहमी गुगल प्ले स्टोअर, ॲप स्टोअर किंवा बँक वेबसाइट्ससारख्या विश्वसनीय ठिकाणांवरूनच बँकिंग ॲप्स डाऊनलोड करा.

  • ॲपची विश्वासार्हता पडताळून पाहा : कोणताही बँकिंग ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी डेव्हलपर तपशील तपासा आणि सूचना वाचा.

  • सॉफ्टवेअर अपडेट ठेवा : तुमच्या फोनचे ओएस आणि सुरक्षा सॉफ्टवेअर नेहमी अद्ययावत असल्याची खात्री करा.

  • टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम करा : तुमच्या खात्यांमध्ये सुरक्षेचा अतिरिक्त स्तर जोडा.

  • बँक खात्यांचे नियमित निरीक्षण करा : कोणत्याही अनधिकृत व्यवहारांसाठी तुमच्या बँक खात्याच्या स्टेटमेंट्सचे नियमितपणे तपशील पाहा.

काय टाळाल?

  • अनधिकृत फाइल डाऊनलोड करू नका : संशयास्पद ईमेल किंवा वेबसाइटवरून लिंक्सवर क्लिक करणे किंवा ॲप्स डाऊनलोड करणे टाळा.

  • अज्ञात ॲप्समध्ये संवेदनशील माहिती भरू नका : कधीही अपरिचित ॲप्स किंवा साइट्सवर बँकिंग तपशील शेअर करू नका.

  • तुमचे डिव्हाइस जेलब्रेक करू नका : तुमचे डिव्हाइस रूट केल्याने ते मालवेअर आणि हल्ल्यांना बळी पडू शकते.

  • तपशील शेअर करू नका : कधीही तुमचा बँकिंग पिन किंवा ओटीपी कोणासोबतही शेअर करू नका, जरी ते स्वतःला सपोर्ट स्टाफ असल्याचा दावा करत असले तरीही.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

कर्जमाफीवरून गदारोळ; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत विरोधक आक्रमक

भारतावर कमी आयात शुल्क लादण्याचे ट्रम्प यांचे संकेत

GST त दिलासा; १२ टक्क्यांचा स्लॅब हटवण्याच्या हालचाली सुरू

शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन; राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल