Freepik
लाईफस्टाईल

चेहऱ्यावरील डाग, पिंपल्सने त्रस्त आहात? काकडीचे पाणी प्या, थोड्याच दिवसात जाणवेल फरक

उष्णतेमुळे होणारा हा त्रास अनेक वेळा औषधं घेऊनही कमी होत नाही. तसेच अनेक वेळा पिंपल्समधून रक्त किंवा पू देखील बाहेर पडतो. तसेच नंतर चेहऱ्यावर याचे डागही पडतात. या सर्व त्रासापासून जादूची छडी फिरवल्याप्रमाणे काही दिवसातच सर्व त्रास दूर होईल. जाणून घ्या कसे...

Kkhushi Niramish

उन्हाळा सुरू आहे. अनेकांना उन्हाळ्यात उष्णतेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा किंवा अॅकनेचा त्रास असतो. उष्णतेमुळे होणारा हा त्रास अनेक वेळा औषधं घेऊनही कमी होत नाही. तसेच अनेक वेळा पिंपल्समधून रक्त किंवा पू देखील बाहेर पडतो. तसेच नंतर चेहऱ्यावर याचे डागही पडतात. या सर्व त्रासापासून जादूची छडी फिरवल्याप्रमाणे काही दिवसातच सर्व त्रास दूर होईल. जाणून घ्या कसे...

काकडीतील पोषक तत्वे

काकडीमध्ये जीवनसत्त्व क आणि के भरपूर प्रमाणात असते. यामध्ये फायबर, प्रोटीन, मँगनीज सारखे अनेक पोषक तत्व असतात. याशिवाय यामध्ये सिलिका नावाचा घटक असतो जो त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. याशिवाय काकडी ही अँटिऑक्सिडंटने भरपूर असते.

काकडीचे पाणी पिण्याचे फायदे

शरीराला हायड्रेट ठेवते

उन्हाळ्यात शरीराचे सातत्याने निर्जलीकरण होत राहते. त्यामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोमेजणे, पुटकूळ्या येणे, पिंपल्स येणे अशा गोष्टी होतात. काकडीत मोठ्या प्रमाणात पाणी असते. त्यामुळे शरीर ताबडतोब हायड्रेट होते. पाण्याची पातळी योग्य राहिल्यामुळे त्वचा उजळते, पिंपल्सचा त्रास होत नाही.

त्वचा चमकदार आणि मुलायम बनते

काकडीमधील अँटिऑक्सिडंट आणि सिलिका हे खास घटक त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. अँटिऑक्सिडंटमुळे त्वचा चमकदार बनते. काकडीचे पाणी पिण्याने याचे फायदे खूप वेगाने होतात.

शरीर विषमुक्त होते (Body Detox)

काकडीचे पाणी शरीराला नैसर्गिकरित्या विषमुक्त करते. यातील शक्तिशाली अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीराची आंतरिक स्वच्छता करते. त्यामुळे शरीर विषमुक्त होण्यास मदत होते.

जीवनसत्त्व बी ५ मुळे त्वचेवर पिंपल्स येत नाही

काकडीमध्ये पँटाथेनिक अॅसिड असते. सोबतच जीवनसत्त्व बी ५ दोन्हींची मात्र अधिक असते. जीवनसत्त्व बी ५ हे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स आणि अॅकनेवर उपचार करण्यासाठी महत्त्वाचे असते. काकडीचे पाणी पिण्याने जीवनसत्त्व ब ५ ची कमतरता पूर्ण होते. त्यामुळे चेहऱ्याची अॅकनेची समस्या संपते.

काकडीचे पाणी कसे तयार करावे?

काकडीचे पाणी तयार करणे खूप सोपे असते. काकडीचे छोटे-छोटे तुकडे कापून घ्या. हे तुकडे एक ग्लास पाण्यात किंवा एक बाटलीभर पाण्यात घाला. हे पाणी ४-५ तास तसेच राहू द्या. या पाण्यात काकडीचे गुणधर्म मिसळतील. त्यानंतर हे पाणी एक एक घोट करत दर एक दीड तासाने प्यावे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Mumbai : गणपती विसर्जनासाठी उद्या कुठे वाहतूक बंद? लोकल, मेट्रो आणि पार्किंगबाबतही महत्त्वाचे अपडेट

बंगळुरूतील CEO ची मोठी घोषणा; "४ राज्यांतील पुरुषांना नोकरी देणार नाही", सोशल मीडियावर चर्चेला उधाण

ठाण्यातील क्लस्टर, पुनर्विकासाला गती; १५ वर्षांत ३० लाख घरांचे लक्ष्य, सिद्धेश्वर नगरचे काम तीन वर्षांत पूर्ण करणार

IIT Bombay Student Suicide Case : साहिल वाकोडेचे वडील पोलिसांच्या ताब्यात; उपोषणासाठी IIT बॉम्बेकडे जाताना रोखले

राज्यात ४७ नवीन अतिरिक्त तहसीलदार कार्यालये