लाईफस्टाईल

तयारी परीक्षेची

Hii friends! कसे आहात? सध्या परीक्षांचा सिझन चालू आहे. त्यामुळे नक्कीच सगळ्यांची डोकी पुस्तकात असतील, सगळं लक्ष आता वार्षिक परीक्षेकडे असेल. शिवाय कधी परीक्षा संपेल आणि कधी एकदा मामाच्या गावी जाणार, असे झाले असेल.

नवशक्ती Web Desk

-खुल जा सिम सिम

-ज्योती कपिले

Hii friends! कसे आहात? सध्या परीक्षांचा सिझन चालू आहे. त्यामुळे नक्कीच सगळ्यांची डोकी पुस्तकात असतील, सगळं लक्ष आता वार्षिक परीक्षेकडे असेल. शिवाय कधी परीक्षा संपेल आणि कधी एकदा मामाच्या गावी जाणार, असे झाले असेल. हो ना? Good! सुट्टीचे बेत तर भारीच असतील की. पण त्या आधी मला जरा तुमचे अभ्यासाचे बेत ऐकायचे आहेत. काय म्हणतेय परीक्षेची तयारी? हो, हो, तुमचा अभ्यास वर्षभर अगदी व्यवस्थित चालू असतो याची मला कल्पना आहे. कारण वाचणारी मुलं नेहमीच वेळच्या वेळी अभ्यास करतात.

वाचन, मनन, पठण आणि चिंतन या गोष्टी यशाचा मूलाधार आहेत, हे नेहमीच ध्यानात, लक्षात ठेवा. आता ‘वाचन’ म्हणजे पुस्तकातील धडा, लेख, कविता या सगळ्या बाबी शब्दांकडे लक्ष देत मनापासून वाचायच्या. वाचनामुळे आपलं ज्ञान वाढतं.

तर ‘मनन’ म्हणजे आपण जे काही वाचतो त्यावर शांतपणे विचार करायचा. वाचलेल्या वाक्याचा, परिच्छेदाचा अर्थ समजावून घ्यायचा. त्यानंतर करायचे ते ‘पठण’ म्हणजे पाठांतर. म्हणजे एखादा धडा, कविता वारंवार वाचायची. जेणेकरून त्यातील सूक्ष्म अर्थ आपल्या लक्षात येईल, लक्षात राहतील. मग आपण ते सहजपणे बोलू किंवा लिहू शकू. सिनेमाची गाणी नाही का आपण वारंवार ऐकतो, म्हणतो. वारंवार ऐकल्यावर ती आपल्याला तोंडपाठ होतात. अगदी तसेच… बरोबर ना? आणि वाचन, मनन, पठण नंतर येतं ते चिंतन! कुठल्याही विषयाच्या सखोल ज्ञानासाठी ‘चिंतन’ अतिशय आवश्यक असतं. आपण वाचलेल्या मुद्द्यांचा सखोल विचार करायचा.

जर तुमच्या अभ्यासाची हीच पद्धत असेल तर मग तुम्हाला परीक्षेची भीती बाळगायचं काहीच कारण नाही. कारण त्या अभ्यासामुळे तुम्हाला आत्मविश्वास येतो आणि परीक्षेचा बाऊ वाटत नाही की भीतीही वाटत नाही आणि हा सर्व प्रयोग जर नियमित शाळा सुरू झाल्यापासून चालू असेल तर मग बघायलाच नको… यश फक्त तुमचं आणि तुमचंच असणार आहे. अभ्यासाची अजून एक सोप्पी टिप सांगते. काही महत्त्वाची सूत्रं, कविता, व्याख्या जर घरात येता-जाता दिसतील अशा लावल्या तर त्या लक्षात राहायला सोप्पं जातं. करून तर बघा… आणि तुम्ही हे सगळं करत असाल तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. फ्रेंड्सच्या काही अडीअडचणी असतील तर त्या सोडवायला त्याला-तिला मदत करा..ती म्हण तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. “एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ!”

गरज प्रथिनांची

परीक्षा आहे म्हणजे रेसिपी नाही असं बिल्कूल नाही. तर आजची रेसिपी तुमच्या परीक्षेशी संबंधित आहे. कारण तब्येत चांगली तर सगळं चांगलं! Ok?

रात्री चार बदाम घ्यायचे, पाण्यात भिजवायचे किंवा मूठभर शेंगदाणे, चण्याची डाळ भिजत घाला आणि सकाळी त्यातील पाणी झाडाला टाकून बदाम सोलून शेंगदाणे, चणाडाळ खाऊन टाकायची. नक्कीच तुमची बुद्धी तेज होईल. हायप्रोटीन्स किंवा प्रथिनांचे फायदे तुमच्या शरीराला मिळतील. तेव्हा भेटूया, लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला All the Very Best!!

बाल साहित्यिक

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री