एकदा खाल्ली की वारंवार खाल! चीज मिरची भजीची भन्नाट रेसिपी 
लाईफस्टाईल

एकदा खाल्ली की वारंवार खाल! चीज मिरची भजीची भन्नाट रेसिपी

संध्याकाळच्या चहा-टाइमसाठी काहीतरी हटके आणि चविष्ट हवंय? चीज भरलेली मिरची भजी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मेल्टेड चीज असलेली ही भजी घरच्या घरी झटपट तयार करता येते.

Mayuri Gawade

संध्याकाळच्या चहा किंवा कॉफीसोबत गरमागरम काहीतरी खायला मिळालं, तर मूडच फ्रेश होतो. नेहमीचे कांदा भजी, बटाटा भजी खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काहीतरी हटके ट्राय करा चीज मिरची भजी!

बाहेरून कुरकुरीत आणि आतून मेल्टेड चीजने भरलेली ही भजी चवीला एकदम भन्नाट लागते. तिखट मिरची आणि क्रीमी चीजचा कॉम्बिनेशन इतका मस्त लागतो की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावंसं वाटतं. विशेष म्हणजे, मिरची खायला नाखूष असलेली मुलंसुद्धा ही भजी आवडीने खातात.

साहित्य
भावनगरी मिरच्या - ६ ते ७
किसलेले चीज - १ वाटी
हिरवी मिरची-लसूण-आले पेस्ट - १ छोटी वाटी
मीठ - चवीनुसार
आमचूर पावडर - चवीनुसार
लिंबाचा रस - १ चमचा
बेसन - दीड वाटी
ओवा - १ चमचा
पाणी - आवश्यकतेनुसार
कोथिंबीर - बारीक चिरलेली
बेकिंग सोडा - चिमूटभर
तेल - तळण्यासाठी

कृती
सर्वप्रथम मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या पुसून घ्या. त्यांना मधून चिरा देऊन बिया काढून टाका.

एका भांड्यात किसलेले चीज, हिरवी मिरची-लसूण-आले पेस्ट, मीठ, आमचूर पावडर आणि लिंबाचा रस घालून नीट मिक्स करा. हे मिश्रण मिरचीमध्ये भरून घ्या.

दुसऱ्या भांड्यात बेसन, ओवा, मीठ आणि पाणी घालून जाडसर पिठ तयार करा. त्यात कोथिंबीर आणि चिमूटभर बेकिंग सोडा घालून फेटून घ्या.

भरलेल्या मिरच्या बेसनाच्या पिठात घोळवून गरम तेलात डीप फ्राय करा. सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

गरमागरम चीज मिरची भजी चहा किंवा कॉफीसोबत सर्व्ह करा.

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट ठरते. घरच्या घरी बनवा आणि चहा-टाइमचा आनंद दुप्पट करा!

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग