लाईफस्टाईल

Chinese Dosa Recipe : डोसा तर नेहमीच खातो, पण 'चायनीज डोसा' कधी ट्राय केलाय का? घरच्या घरी बनवा हटके रेसिपी

कुरकुरीत डोसा आणि त्यात भरलेले नूडल्स-स्टाईल भाज्यांचे मसालेदार मिश्रण यामुळे या पदार्थाची चव अधिकच खास लागते. घरच्या घरी चायनीज डोसा कसा बनवायचा, चला जाणून घेऊया.

किशोरी घायवट-उबाळे

दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये डोसा हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी डोसा हमखास बनवला जातो. पण तुम्ही कधी चायनीज डोसा खाल्लाय का? पारंपारिक डोश्याला चायनीज फ्लेवरची जोड देऊन तयार केलेली ही फ्युजन रेसिपी सध्या खूप लोकप्रिय होत आहे. कुरकुरीत डोसा आणि त्यात भरलेले नूडल्स-स्टाईल भाज्यांचे मसालेदार मिश्रण यामुळे या पदार्थाची चव अधिकच खास लागते. घरच्या घरी चायनीज डोसा कसा बनवायचा, चला जाणून घेऊया.

साहित्य :

  • डोसा बॅटर - ४ कप

  • कांदा (पातळ कापलेला) - १ मध्यम

  • कोबी (बारीक चिरलेला) - अर्धा लहान

  • हिरवी ढोबळी मिरची (पातळ स्ट्रिप्स) - १ मोठी

  • गाजर (किसलेले) - १ मोठे

  • तेल - ४ ते ५ टेबलस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • व्हाईट पेपर पावडर - अर्धा टीस्पून

  • बीन स्प्राउट्स - अर्धा कप

  • सॉस - १ टेबलस्पून

  • सोया सॉस - अर्धा टेबलस्पून

  • स्प्रिंग ऑनियन ग्रीन्स (बारीक चिरलेले) - अर्धा कप

कृती :

सर्वप्रथम कढईत २ टेबलस्पून तेल गरम करा. त्यात कांदा घालून लालसर होईपर्यंत परता. आता त्यात कोबी, ढोबळी मिरची, गाजर, मीठ आणि व्हाईट पेपर घालून चांगले मिक्स करा. त्यानंतर बीन स्प्राउट्स, सॉस आणि थोडासा सोया सॉस घालून ३० सेकंद परता आणि मिश्रण बाजूला ठेवा.

त्यानंतर डोसा बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालून हलके मिक्स करा. नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर तेल लावलेल्या कांद्याने हलके ग्रीस करा. तव्यावर एक मोठा चमचा बॅटर टाकून गोल पसरवा आणि १ मिनिट शिजू द्या. आता तयार केलेले भाज्यांचे मिश्रण डोश्यावर पसरवा. वरून स्प्रिंग ऑनियन ग्रीन्स घाला. डोसा खालून सोनेरी होईपर्यंत शिजवा. तयार डोसा अर्धा फोल्ड करून गरमागरम सर्व्ह करा.

टिप्स :

  • डोसा अधिक कुरकुरीत हवा असेल तर तव्यावर थोडे अधिक तेल शिंपडा.

  • नूडल्स आवडत असतील तर स्टफिंगमध्ये थोडे उकडलेले नूडल्सही घालू शकता.

  • तिखटपणा वाढवण्यासाठी चिली सॉस किंवा ग्रीन चिली सॉस वापरू शकता.

  • मुलांसाठी बनवत असाल तर सॉसचे प्रमाण थोडे कमी ठेवा.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती