चहासोबत परफेक्ट; आंब्याचा सीझन संपायच्या आधी ट्राय करा कुरकुरीत आंब्याचे भजी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

चहासोबत परफेक्ट; आंब्याचा सीझन संपायच्या आधी ट्राय करा कुरकुरीत आंब्याचे भजी

बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लागणारे हे फुगलेले भजी चहासोबत खायला एकदम परफेक्ट लागतात.

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळ्यात आंब्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात. आंब्याचा रस, आमरस, आईस्क्रीम किंवा शेक तर अनेकजण आवडीने खातात. मात्र यावेळी काहीतरी हटके आणि झटपट बनणारे खायचे असेल तर 'आंब्याचे भजी' हा उत्तम पर्याय ठरू शकतो. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लागणारे हे फुगलेले भजी चहासोबत खायला एकदम परफेक्ट लागतात. कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडू शकते.

आंब्याच्या गोड चवीमुळे मिळतो खास स्वाद

या भजींमध्ये आंब्याचा रस किंवा मँगो पल्प वापरला जातो. त्यामुळे भजींना हलकी गोडसर चव आणि वेगळा फ्लेवर मिळतो. रवा, बडीशेप आणि काळे तीळ यामुळे भजी अधिक कुरकुरीत आणि स्वादिष्ट लागतात.

साहित्य :

  • २ कप गव्हाचे पीठ

  • २ टेबलस्पून रवा

  • १/२ टीस्पून काळे तीळ

  • १/२ टीस्पून बडीशेप

  • चवीनुसार मीठ

  • १/२ टीस्पून बेकिंग सोडा

  • १ वाटी आंब्याचा रस किंवा मँगो पल्प

  • तळण्यासाठी तेल

कृती :

एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, काळे तीळ, बडीशेप, मीठ आणि बेकिंग सोडा घालून एकत्र करा. आता त्यात आंब्याचा रस किंवा मँगो पल्प घालून मऊसर पीठ मळून घ्या. आवश्यक वाटल्यास थोडे पाणी घालू शकता. तयार पिठाचे छोटे गोळे किंवा पुरीसारखे आकार तयार करा.

कढईत तेल गरम करून भजी मध्यम आचेवर सोनेरी आणि फुगलेले होईपर्यंत तळून घ्या. तयार आंब्याचे भजी चहा किंवा कॉफीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

टिप्स :

गोड आंब्याचा रस वापरा - भजी चविष्ट लागण्यासाठी गोड आणि ताज्या आंब्याचा रस वापरणे उत्तम.

पीठ जास्त पातळ ठेवू नका - पीठ खूप पातळ असल्यास भजी व्यवस्थित फुगत नाहीत.

मध्यम आचेवर तळा - भजी कुरकुरीत होण्यासाठी मध्यम आचेवर तळणे महत्त्वाचे आहे.

वेलची पावडर घालू शकता - सुगंधासाठी पिठात चिमूटभर वेलची पावडर घालू शकता.

Mumbai : मंत्रालयातील दूषित पाणीप्रश्नी समिती गठित; मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे निर्देश

Mumbai : अनधिकृत बांधकामांवर आता AI ची नजर; तिवाना यांची ठरावाची सूचना सभागृहात मंजूर

Thane : शाळांसमोर पानटपऱ्या, अमली पदार्थांची विक्री; विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू, महासभेत नगरसेवकांचा संताप

Mumbai : पालिका सभागृहात आरोग्य सुविधांवर भर; महापौर वैद्यकीय निधी कक्ष सुरू होणार

Mumbai : बनावट जन्मदाखल्याचा फटका सर्वसामान्यांना; विदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची कोंडी, सभागृहात प्रशासनावर सर्वपक्षीय टीका