

जर तुम्हाला सीफूड खायला आवडत असेल, तर फिश टिक्का हा पदार्थ नक्कीच तुमच्या आवडीचा असेल. मसाल्यांचा झणझणीत स्वाद, लिंबाचा आंबटपणा आणि दह्यामुळे मिळणारी क्रीमी टेस्ट यामुळे फिश टिक्का अधिकच स्वादिष्ट लागतो. खास पार्टी, वीकेंडला फिश टिक्का खाण्याची मजाच काही वेगळी असते. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा रेस्टॉरंट स्टाईल पदार्थ बनवू शकता.
साहित्य :
१ कप घट्ट दही
४ टेबलस्पून तेल
१ कांद्याची पेस्ट
१ टेबलस्पून आले पेस्ट
१ टेबलस्पून लसूण पेस्ट
४ टेबलस्पून लिंबाचा रस
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून धणे पूड
१ टीस्पून जिरे पूड
१/४ टीस्पून जायफळ पूड
१ टेबलस्पून लाल तिखट
चवीनुसार मीठ
फिश फिलेट (बोनलेस तुकडा)
सजावटीसाठी कोथिंबीर
फिश टिक्का बनवण्याची कृती :
एका मोठ्या बाऊलमध्ये दही, तेल, कांद्याची पेस्ट, आले-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्या. तयार मिश्रणात हळद, धणे पूड, जिरे पूड, जायफळ पूड, लाल तिखट आणि मीठ घालून चांगले फेटून घ्या. फिश फिलेट (माशाचे काटे आणि त्वचा काढून घेतलेला स्वच्छ, बोनलेस तुकडा) या मसाल्यात घालून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित कोट करा. त्यानंतर हे मिश्रण झाकून किमान एक तास फ्रिजमध्ये ठेवा. मॅरिनेट केलेले फिश स्क्युअरमध्ये लावा आणि वरून थोडी कोथिंबीर घाला. आता हे फिश १० ते १५ मिनिटे शिजवा.
सर्व्ह करण्याची पद्धत
गरमागरम फिश टिक्का हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. यासोबत कांदा आणि लिंबू दिल्यास चव आणखी वाढते.
टिप्स :
ताजे मासे वापरा - फिश टिक्क्यासाठी नेहमी ताजे आणि बोनलेस फिश वापरल्यास चव अधिक छान लागते.
जास्त वेळ मॅरिनेट करा - फिश अधिक स्वादिष्ट लागण्यासाठी ते किमान १ तास मॅरिनेट करणे महत्त्वाचे आहे.
ओव्हरकूक करू नका - फिश जास्त वेळ शिजवल्यास ते कोरडे होऊ शकते. त्यामुळे योग्य वेळेतच शिजवा.
स्मोकी फ्लेवरसाठी - तंदुरीसारखा स्वाद हवा असल्यास कोळशाचा धूर देऊ शकता.