'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Summer Skin Care : टॅनिंग, ऑइलिनेस आणि पिंपल्सपासून सुटका; काकडी-तुळशीचा टोनर वापरून पाहा

उन्हाळ्यात टॅनिंग, ऑइलिनेस आणि पिंपल्सचा त्रास वाढतो. अशावेळी काकडी आणि तुळशीपासून तयार होणारा घरगुती टोनर त्वचेला थंडावा देत नैसर्गिक ग्लो मिळवून देऊ शकतो. जाणून घ्या हा सोपा उपाय आणि त्याचे फायदे.

Mayuri Gawade

उन्हाळा आला की सर्वात आधी परिणाम दिसतो तो आपल्या त्वचेवर. कडक ऊन, घाम आणि धुळीमुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. टॅनिंग, पिंपल्स आणि ऑइलिनेस या समस्या वाढतात आणि मग आपण महागडे स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरायला सुरुवात करतो. मात्र, त्यातील रसायने त्वचेला अधिक नुकसान पोहोचवू शकतात.

अशा वेळी घरच्या घरी तयार होणारे नैसर्गिक उपाय अधिक फायदेशीर ठरतात. काकडी आणि तुळस या दोन्ही गोष्टी सहज उपलब्ध असल्या तरी त्यांच्या त्वचेसाठी असलेल्या गुणधर्मांकडे अनेकदा दुर्लक्ष होतं.

काकडीत पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने ती त्वचेला हायड्रेट ठेवते आणि थंडावा देते. तर तुळशीतील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्स कमी करण्यात मदत करतात. या दोघांचा एकत्रित वापर केल्यास चेहरा अधिक स्वच्छ, फ्रेश आणि टवटवीत दिसू शकतो.

काकडी-तुळशीचा टोनर कसा तयार कराल?

यासाठी एक मध्यम आकाराची काकडी, १० ते १२ तुळशीची पाने, २ ते ३ चमचे गुलाब पाणी आणि अर्धा चमचा लिंबाचा रस लागतो.

सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून साल काढा आणि किसून तिचा रस गाळून घ्या. त्यानंतर तुळशीची पाने धुवून हलकी कुस्करून त्यांचा रस तयार करा. आता काकडीचा आणि तुळशीचा रस एकत्र करून त्यात गुलाब पाणी आणि लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण नीट ढवळून स्वच्छ स्प्रे बाटलीत भरून ठेवा.

वापरताना चेहरा आधी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर हे टोनर चेहऱ्यावर स्प्रे करा किंवा कापसाने लावा. ते पुसू नका, नैसर्गिकरित्या त्वचेत शोषू द्या.

या टोनरचे फायदे :

  • त्वचेला नैसर्गिक थंडावा मिळतो.

  • टॅनिंग कमी होण्यास मदत होते.

  • पिंपल्स आणि सूज कमी करण्यात उपयोगी.

  • त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित होतं.

  • मोठी छिद्रं (pores) लहान दिसू लागतात.

  • त्वचा अधिक फ्रेश आणि टवटवीत दिसते.

  • नियमित वापराने नैसर्गिक ग्लो मिळतो.

उन्हाळ्यात महागड्या प्रॉडक्ट्सऐवजी हा सोपा आणि नैसर्गिक उपाय करून पाहा आणि त्वचेला द्या कूल, फ्रेश लूक.

(Disclaimer : या लेखातील माहिती ही सामान्य माहिती व घरगुती उपायांवर आधारित आहे. ‘नवशक्ति’ या उपायांच्या परिणामकारकतेची हमी देत नाही. कोणताही उपाय वापरण्यापूर्वी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

सेनेची लोकशाही रचना उद्धव यांनी बदलली; शिंदे गटाच्या वकिलांचा आरोप, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

Maratha Reservation : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; मराठा समाज आक्रमक, अनेक जिल्ह्यांत आंदोलन

एसटी आता 'विना वाहक'; महामंडळाची आर्थिकस्थिती सुधारण्यासाठी मनुष्यबळ खर्चात कपात

गणेश गल्लीत अवतरणार 'संतभूमी'! संतांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे जिवंत दर्शन देखाव्यांतून घडविणार

अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्लेमधील अतिक्रमणे हटवली; 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा