Morning Routine Tips : दिवसाची सुरुवात अशी करा; सामंथा रुथ प्रभूचे ‘८ स्टेप पॉवर मॉर्निंग’ रूटीन, २१ दिवसांत दिसेल फरक

सकाळची सुरुवात योग्य पद्धतीने केल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहू शकतात. सामंथा रुथ प्रभूने सुचवलेले ‘८ स्टेप पॉवर मॉर्निंग’ रूटीन २१ दिवस सातत्याने पाळल्यास फिटनेस, ऊर्जा आणि मानसिक संतुलनात सकारात्मक बदल जाणवू शकतात.
दिवसाची सुरुवात अशी करा; सामंथा रुथ प्रभूचे ‘८ स्टेप पॉवर मॉर्निंग’ रूटीन, २१ दिवसांत दिसेल फरक
दिवसाची सुरुवात अशी करा; सामंथा रुथ प्रभूचे ‘८ स्टेप पॉवर मॉर्निंग’ रूटीन, २१ दिवसांत दिसेल फरक
Published on

आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर फक्त चौरस आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप पुरेशी नसते, तर योग्य दिनचर्याही तितकीच महत्त्वाची असते. अनेकदा आपण सगळं व्यवस्थित करत असूनही अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. अशावेळी नेमकं काय चुकतंय, हे समजून घेणं गरजेचं ठरतं.

अशा वेळी काही कलाकार त्यांच्या फिटनेस आणि लाइफस्टाईलमधून मार्गदर्शन देताना दिसतात. सामंथा रुथ प्रभूनेही तिच्या सकाळच्या दिनचर्येबद्दल सांगताना दिवसाची सुरुवात कशी करतो, याचा थेट परिणाम शरीर आणि मनावर होत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

तिच्या मते, अनेक रूटीन करून पाहिल्यानंतर तिला स्वतःसाठी एक साधं आणि प्रभावी मॉर्निंग रूटीन सापडलं, ज्याला ती ‘८ स्टेप पॉवर मॉर्निंग’ असं म्हणते. विशेष म्हणजे, सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईल, काम किंवा बातम्यांकडे वळल्यास ताण वाढतो, कारण त्या वेळी शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स आधीच जास्त असतात.

म्हणूनच, सकाळची सुरुवात जाणीवपूर्वक आणि शांत पद्धतीने करणं गरजेचं आहे. तिच्या मते, हे रूटीन सलग २१ दिवस पाळल्यास शरीर आणि मनात सकारात्मक बदल स्पष्टपणे जाणवू लागतात.

दिवसाची सुरुवात अशी करा; सामंथा रुथ प्रभूचे ‘८ स्टेप पॉवर मॉर्निंग’ रूटीन, २१ दिवसांत दिसेल फरक
सकाळचे पहिले २ तास कसे घालवावेत? न्यूट्रिशनिस्टचा सल्ला; एनर्जी आणि फोकस वाढवणारा परफेक्ट दिनक्रम जाणून घ्या

काय आहे हे '८ स्टेप पॉवर मॉर्निंग' रूटीन?

१. उठल्या उठल्या मोबाईलपासून दूर राहा
सकाळी उठल्यावर लगेच फोन, सोशल मीडिया किंवा न्यूज पाहणं टाळा. यामुळे मेंदूवर अनावश्यक ताण येतो आणि दिवसाची सुरुवात गडबडीत होते.

२. ५ मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा
काही मिनिटं शांत बसून श्वसनावर लक्ष केंद्रित केल्याने मन स्थिर राहतं आणि दिवसासाठी मानसिक तयारी होते.

३. नैसर्गिक सूर्यप्रकाश घ्या
उठल्यानंतर थोडा वेळ सूर्यप्रकाशात राहिल्यास शरीराचा बायोलॉजिकल क्लॉक संतुलित राहतो आणि ऊर्जा वाढते.

४. हेल्दी मॉर्निंग ड्रिंक घ्या
कोमट पाण्यात लिंबू, हळद, ॲपल सायडर व्हिनेगर आणि ऑलिव्ह ऑइल मिसळून घेतलेलं ड्रिंक शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं.

५. संतुलित नाश्ता करा
प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स असलेला नाश्ता केल्याने रक्तातील साखर स्थिर राहते आणि दिवसभर ऊर्जा टिकते.

६. सकाळी शरीर सक्रिय ठेवा
११ वाजण्यापूर्वी हलका व्यायाम, चालणं किंवा स्ट्रेचिंग केल्याने शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतात.

७. कॉफी/चहा नाश्त्यानंतरच घ्या
रिकाम्या पोटी कॉफी घेण्यापेक्षा नाश्त्यानंतर घेतल्यास अ‍ॅसिडिटी कमी होते आणि ऊर्जा संतुलित राहते.

८. दिवसाची योजना लिहून ठेवा
आज काय करायचं आहे, हे लिहून ठेवल्यास लक्ष केंद्रित राहण्यास मदत होते आणि कामं वेळेत पूर्ण होतात.

तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ज्ञांच्या मते, सकाळची पहिली एक तासाची वेळ शरीराच्या हार्मोन्स, मेटाबॉलिझम आणि मानसिक स्पष्टतेवर थेट परिणाम करते. या वेळेत स्क्रीनपासून दूर राहणं, शांतता राखणं आणि हलकी शारीरिक हालचाल करणं फायदेशीर ठरतं.

‘मॉर्निंग ड्रिंक’ सगळ्यांसाठी योग्य आहे का?

कोमट पाणी आणि लिंबू शरीरासाठी फायदेशीर असलं तरी त्यात अनेक घटक मिसळणं प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाही. काही वेळा यामुळे पोटाचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे साधेपणावर भर देणं महत्त्वाचं आहे.

नाश्ता आणि कॉफीबाबत लक्षात ठेवा

संतुलित नाश्ता केल्यास रक्तातील साखर स्थिर राहते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते. तसेच रिकाम्या पोटी कॉफी घेण्याऐवजी नाश्त्यानंतर घेतल्यास अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो.

परिपूर्णतेपेक्षा सातत्य महत्त्वाचं

या रूटीनचा उद्देश परफेक्ट बनणं नाही, तर सातत्य ठेवणं आहे. सकाळची सुरुवात सजगपणे करणं, हलका व्यायाम आणि संतुलित आहार या सवयी अंगीकारल्यास हळूहळू शरीर आणि मन दोन्हीत सकारात्मक बदल दिसू शकतात.

Disclaimer : या लेखातील माहिती ही सार्वजनिक स्रोत, सेलिब्रिटींचे अनुभव आणि तज्ज्ञांच्या सर्वसाधारण मार्गदर्शनावर आधारित आहे. ‘नवशक्ति’ या माहितीची अचूकता किंवा परिणामकारकता याची हमी देत नाही. कोणतीही नवीन दिनचर्या, आहार किंवा आरोग्यविषयक सवय सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

logo
marathi.freepressjournal.in