14 फेब्रुवारी 'व्हॅलेन्टाईन डे' म्हणजे प्रेमाचा दिवस या दिवशी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रेम व्यक्त करत असतात. प्रत्येकांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत ही निराळी असते. काही जणं या दिवशी काहीतरी हटके प्लान करतात. तर बहुतेकजण आपल्या प्रियकर प्रेयसीला खास भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. दरवर्षी काहीतरी खास आणि आकर्षक भेटवस्तू देऊन आपल्या प्रियकर प्रेयसीला खुश करावे अशी अनेकांची इच्छा असते. परंतू, नेमके काय द्यावे, या गोंधळात आपण पडतो. पण तुमच्या पार्टनरला नक्की आवडेल अश्या आकर्षक भेटवस्तुंची यादीच तूमच्यासाठी आणली आहे. तर जाणून घ्या यंदाचा व्हॅलेन्टाईन डे विशेष बनवण्यासाठी तुम्ही पार्टनरला कोणत्या आकर्षक भेटवस्तू देऊ शकता.
इन्स्टॅक्स कॅमेरा
तुम्ही फोटो काढण्यासाठी मोबाईल कॅमेराचा वापर करत असला तरी, इन्स्टॅक्स कॅमेराची सर मोबाईलला नाही आणि हे इन्स्टॅक्स कॅमेरे वापरण्यासाठी खूप छान असतात. आपल्या आयुष्यातील सुंदर क्षण कॅमेरात टिपून कायमच्या आठवणी म्हणून जपून ठेवू शकता. तुमच्या प्रेयसीला हे गिफ्ट नक्की आवडेल.
कपल्स कीचेन
आपल्या प्रियकर प्रेयसीच्या नावाच्या पहिल्या अक्षराचे किचन भेटवस्तू म्हणून देऊ शकता. अशा प्रकारच्या किचेनमध्ये तुम्ही तुमचे छायाचित्र देखील लावू शकता. ही भेट तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी अगदी खास भेट असेल. ही भेट ती नक्कीच कायम जवळ ठेवता येते.
स्किन केअर आणि ब्युटी हॅम्पर
एखाद्या स्त्रिला ब्युटी हॅम्परपेक्षा सुंदर गिफ्ट काय असेल. सुंदर दिसणे हे प्रत्येक स्त्रीचा जन्मजात अधिकारच आहे. प्रत्येक स्त्री आपल्या सौदर्याची विशेष काळजी घेत असते. तिचे सौंदर्य अधिक खुलण्यासाठी, तिला अधिक आनंदी करण्यासाठी तुम्ही तिला एक मेकअप हॅम्पर बॉक्स देण्याची योजना खूप उत्तम असेल.
फोटो फ्रेम
आपल्या बालपणीच्या आठवणी एका फोटो फ्रेममध्ये भेट देणे ही एक अप्रतिम भेट ठरू शकते. तसेच, तुमचे प्रेम सुरू करण्यासाठी ही एक चांगली कल्पना आहे. तुमच्या दोघांचे फोटो त्यात जोडू शकता आणि ते तुमच्या प्रिय व्यक्तिला भेट देऊ शकता.
परफ्यूम
परफ्यूम हे सर्वांचेच प्रिय असतात. हाच सुगंध तुम्हाला एकमेकांच्या हृदयाच्या जवळ आणण्याचे काम करेल. तिला व्हॅलेंटाईन डेची ही भेट नक्की आवडेल.
टेक्नो इअरबड्स
जर तुमचा प्रियकर प्रेयसी टेक-सॅव्ही असेल आणि नवीन लॉन्च केलेले गॅझेट एक्सप्लोर करायला आणि खरेदी करायला त्यांना आवडत असेल, तर त्याला किंवा तिला फक्त एक इयरबड खरेदी करा.
कपल्स रिंग्ज
बाजारात अनेक डिजाईनच्या अंगठ्या आलेल्या असतात, अंगठी हे शाश्वत प्रेमाचे प्रतिक मानले जाते. म्हणूनच लग्नापूर्वी साखरपुड्यात वर वधू एकमेकांच्या बोटात अंगठी घालतात. त्यालाच आपण रिंग सेरेमनी म्हणतो. त्यामूळे तुम्ही त्याच्यासाठी किव्हा तिच्यासाठी अंगठी घेऊ शकतात.