गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना गुड न्यूज! मुंबई-सावंतवाडी नवी एक्सप्रेस उद्यापासून धावणार; गाडीचे वेळापत्रक पाहा

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-कोकण प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई सीएसएमटी-सावंतवाडी रोड नवी दैनिक एक्सप्रेस ३ सप्टेंबरपासून सुरू होत असून, तिचं पहिल्या फेरीचं वेळापत्रक आणि थांबे जाणून घ्या.
गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना गुड न्यूज! मुंबई-सावंतवाडी नवी एक्सप्रेस उद्यापासून धावणार; गाडीचे वेळापत्रक पाहा
गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना गुड न्यूज! मुंबई-सावंतवाडी नवी एक्सप्रेस उद्यापासून धावणार; गाडीचे वेळापत्रक पाहा संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुंबई सीएसएमटी-सावंतवाडी रोडदरम्यानची नवी दैनिक एक्सप्रेस ३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर ही नवी रेल्वेसेवा सुरू होत असल्याने मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखवून पहिली फेरी मार्गस्थ करण्यात येणार आहे.

३ सप्टेंबरच्या पहिल्या फेरीचं वेळापत्रक

गाडी क्रमांक १५०८७ सीएसएमटी-सावंतवाडी रोड एक्सप्रेस ३ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता मुंबई सीएसएमटीहून सुटेल आणि ४ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. सुमारे ५०९ किलोमीटरचं अंतर ही गाडी १३ तासांत पूर्ण करणार आहे.

पहिल्या फेरीदरम्यान गाडीच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत :

  • मुंबई सीएसएमटी : दुपारी २.३० वाजता प्रस्थान

  • दादर : २.४२ / २.४५

  • ठाणे : ३.०२ / ३.०५

  • पनवेल : ३.४७ / ३.५०

  • पेण : ४.३८ / ४.४०

  • रोहा : ५.५७ / ६.००

  • रत्नागिरी : रात्री १०.०५ / १०.१०

  • कणकवली : मध्यरात्री १२.४० / १२.४२

  • कुडाळ : पहाटे १.४० / १.४२

  • सावंतवाडी रोड : पहाटे ३.३० वाजता आगमन

याशिवाय माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड आणि सिंधुदुर्ग या स्थानकांवरही गाडीला व्यावसायिक थांबे देण्यात आले आहेत.

गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना गुड न्यूज! मुंबई-सावंतवाडी नवी एक्सप्रेस उद्यापासून धावणार; गाडीचे वेळापत्रक पाहा
मुंबई-सावंतवाडी दरम्यान नवीन एक्स्प्रेस धावणार; चाकरमानी, पर्यटकांची मोठी सोय होणार

१६ एलएचबी डब्यांसह धावणार

ही नवी एक्सप्रेस अत्याधुनिक १६ एलएचबी डब्यांसह धावणार आहे. यामध्ये १ फर्स्ट एसी, २ सेकंद एसी, ३ थर्ड एसी, ४ स्लीपर क्लास आणि ४ सामान्य डबे असतील. त्यामुळे विविध श्रेणीतील प्रवाशांना आपल्या सोयीनुसार प्रवास करता येणार आहे.

नियमित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

गाडी क्रमांक १५०८७/१५०८८ ही नियमित दैनिक एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. या गाडीचं नियमित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही नवी सेवा प्रवास अधिक सोयीचा करण्यास मदत करणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in