गुरुपौर्णिमा विशेष : सन्मान करुया ज्ञानदात्यांचा
प्राचीन काळापासून गुरुपौर्णिमेला "व्यास पौर्णिमा" म्हणूनही ओळखले जाते. महर्षी व्यास यांच्या स्मरणार्थ साजरा होणारा हा दिवस भारतीय संस्कृतीत अतिशय पूजनीय मानला जातो. गुरु हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा साक्षात स्वरूप मानले गेले आहे. आपल्या आयुष्यातील मार्गदर्शक, शिक्षक, पालक, किंवा एखादा शब्दही न बोलता योग्य दिशा दाखवणारा कोणीही गुरुच असतो. अशा गुरूंना वंदन करण्यासाठी आजचा दिवस खास आहे. खाली दिले आहेत खास मराठी संदेश, जे तुम्ही तुमच्या गुरुंना पाठवू शकता.
>गुरु म्हणजे दीप, गुरु म्हणजे दिशा,
गुरु म्हणजे नवा श्वास, गुरु म्हणजे जणू विश्वाचा प्रकाश.
गुरुपौर्णिमेच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा!
>ना पुस्तकात सापडते, ना प्रवचनात,
जगणं शिकवलं ज्यांनी अशा गुरूंना मानाचा मुजरा!
गुरुपौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा!
>जीवनाच्या वळणावर ज्यांनी हात धरून चालवलं,
अंधारात ज्यांनी प्रकाश दिला, अशा गुरूंना शतशः प्रणाम.
>शब्दांच्या पलिकडचं जे शिकवतात,
मौनातूनही मनात नवी दिशा दाखवतात…
अशा गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
>गुरु म्हणजे परीस,
शिष्य म्हणजे लोखंड…
सोनं करणारं असं हे स्पर्श,
जन्मभर विसरता येत नाही.
>गुरुंचं अस्तित्व म्हणजे
जीवनात अढळ असणारा विश्वास,
जो वाट चुकायला कधीच देत नाही…
>गुरु म्हणजे ज्ञानाचा समुद्र,
ज्याच्या किनाऱ्यावर आपलं आयुष्य घडतं…
>तुझं अस्तित्वच माझ्या आयुष्याचं सार आहे,
गुरु, तूच माझा आधार आहेस… गुरुपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
या गुरुपौर्णिमेला केवळ शुभेच्छा देऊन थांबू नका, तर तुमच्या आयुष्यातील गुरूंना मनापासून धन्यवाद द्या. त्यांचं मार्गदर्शन हीच खरी संपत्ती आहे… कारण गुरु असतो, म्हणून शिष्य घडतो.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)