(Photo-X/@sanjeevkapoor)
लाईफस्टाईल

फिटनेससाठी परफेक्ट रेसिपी; नाश्त्यात बनवा ओट्स-ज्वारी थालीपीठ

विविध भाज्यांनी युक्त ओट्स-ज्वारी थालीपीठ हा असा एक पौष्टिक पर्याय आहे, जो चव आणि आरोग्य यांचा उत्तम मिलाफ ठरतो. जाणून घ्या याची सोपी रेसिपी.

किशोरी घायवट-उबाळे

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात हेल्दी आणि पोटभर नाश्ता शोधणे कठीण जाते. वजन नियंत्रण, पचन सुधारणा आणि संतुलित आहारासाठी ओट्स आणि ज्वारी यांसारख्या धान्यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. विविध भाज्यांनी युक्त ओट्स-ज्वारी थालीपीठ हा असा एक पौष्टिक पर्याय आहे, जो चव आणि आरोग्य यांचा उत्तम मिलाफ ठरतो. जाणून घ्या याची सोपी रेसिपी.

साहित्य :

  • क्विक कुकिंग ओट्स - दीड कप

  • ओट्स पीठ - दीड कप

  • ज्वारी पीठ - १ कप

  • किसलेले गाजर - ४ ते ६ टेबलस्पून

  • किसलेला भोपळा - ४ ते ६ टेबलस्पून

  • चिरलेली फरसबी - ४ टेबलस्पून

  • किसलेली कोबी - ४ टेबलस्पून

  • किसलेला दुधी भोपळा - ४ ते ६ टेबलस्पून

  • चिरलेला कांदा - ४ टेबलस्पून

  • चिरलेल्या हिरव्या मिरच्या - ४

  • हळद - अर्धा टीस्पून

  • लाल तिखट - दीड टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • दही - अर्धा कप

  • भाजलेले पांढरे तीळ - ४ टीस्पून

  • कोथिंबीर - ४ टेबलस्पून

  • तेल (आणि भाजण्यासाठी अतिरिक्त) - ४ टेबलस्पून

  • दही - सर्व्ह करण्यासाठी

कृती :

एका मोठ्या भांड्यात ओट्स, ओट्स पीठ आणि ज्वारी पीठ घ्या. त्यात सर्व भाज्या, मिरच्या, हळद, तिखट, मीठ, दही, तीळ आणि कोथिंबीर घालून चांगले मिसळा. त्यात अर्धा कप पाणी घालून मिश्रण एकजीव करा. नंतर ४ टेबलस्पून तेल घालून पुन्हा मिक्स करा. ओल्या मलमलच्या कापडावर मिश्रणाचा गोळा ठेवा. थोडे पाणी शिंपडून हाताने थापत मध्यम जाडीचे थालीपीठ तयार करा. त्यावर छिद्रे पाडा. गरम नॉन-स्टिक तव्यावर हलक्या हाताने थालीपीठ ठेवा आणि कापड अलगद काढा. छिद्रांमध्ये आणि कडेला तेल घालून मध्यम आचेवर ४ ते ५ मिनिटे भाजा. उलटून दुसरी बाजूही तितक्याच वेळ भाजा. गरमागरम दह्यासोबत सर्व्ह करा.

टिप्स :

  • मिश्रण फार पातळ करू नका. नाहीतर थालीपीठ तुटू शकते.

  • मलमलचे कापड वापरल्यास थालीपीठ सहज तव्यावर हलवता येते.

  • अधिक पौष्टिकतेसाठी मेथीची पाने किंवा पालकही घालू शकता.

  • मंद-मध्यम आचेवर भाजल्यास थालीपीठ कुरकुरीत आणि आतून मऊ राहते.

  • कमी तेलाचा वापर करूनही हे थालीपीठ बनवता येते.

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; पुण्यातील घटनेचा VIDEO व्हायरल

मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण

प्रयागराजमधील ड्रग्जची 'फॅक्टरी' उद्ध्वस्त; गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ची कारवाई, ६९.७५९ किलो एमडी जप्त

एसआयटीकडून चौकशी करा! डॉक्टर आत्महत्येप्रकरणी फलटणमध्ये जनआक्रोश मोर्चा

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी