फ्रिजमधील थंड पाणी पिताय? सावधान! आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम, तज्ज्ञांचा इशारा

बर्फासारखं थंड पाणी पिल्यानंतर क्षणभर ताजेतवाने वाटत असलं तरी त्याचे दुष्परिणाम हळूहळू जाणवू शकतात, असा इशारा तज्ज्ञ देतात.
फ्रिजमधील थंड पाणी पिताय? सावधान! आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम, तज्ज्ञांचा इशारा
Published on

कोणताही ऋतू असला तरी अनेक जण फ्रिजमधील थंडगार पाणी पिणे पसंत करतात. उन्हाळ्यात तर हे प्रमाण अधिक वाढते. पण पावसाळा किंवा हिवाळ्यातही अनेकांना ही सवय सोडवत नाही. बर्फासारखं थंड पाणी पिल्यानंतर क्षणभर ताजेतवाने वाटत असलं तरी त्याचे दुष्परिणाम हळूहळू जाणवू शकतात, असा इशारा तज्ज्ञ देतात.

फ्रिजमधील थंड पाणी पिताय? सावधान! आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम, तज्ज्ञांचा इशारा
परफेक्ट मेकअपसाठी फाऊंडेशन कसं लावायचं? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अतिशय थंड पाणी पिल्याने घशात खवखव, सर्दी-खोकला आणि घशातील सूज वाढण्याची शक्यता असते. काहींना डोकेदुखी किंवा 'ब्रेन फ्रीझ'सारखा त्रास जाणवतो. विशेषतः व्यायामानंतर किंवा उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिल्याने शरीराच्या तापमानात अचानक बदल होऊन अस्वस्थता वाढू शकते.

फ्रिजमधील थंड पाणी पिताय? सावधान! आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम, तज्ज्ञांचा इशारा
Masala Khakhra : रोजच्या नाश्त्याला द्या नवा ट्विस्ट; घरीच बनवा कुरकुरीत मसाला खाकरा, वाचा रेसिपी

तज्ज्ञांच्या मते, अतिथंड पाणी पचनक्रियेवरही परिणाम करू शकते. जेवणानंतर लगेच थंड पाणी पिल्याने पचनरसांचे कार्य मंदावू शकते, त्यामुळे अपचन, गॅस किंवा पोटफुगीसारखे त्रास उद्भवू शकतात. ज्यांना सायनस, टॉन्सिल्स किंवा आधीपासून पचनासंबंधी समस्या आहेत त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

फ्रिजमधील थंड पाणी पिताय? सावधान! आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम, तज्ज्ञांचा इशारा
लिव्हर डॅमेज टाळायचंय? ब्लॅक कॉफीपासून हळदीपर्यंत 'या' गोष्टींचा आहारात करा समावेश, वाचा तज्ज्ञ काय सांगतात...

याचा अर्थ थंड पाणी पूर्णपणे टाळावे असा नाही, मात्र अतिरेक टाळणे महत्त्वाचे आहे. सामान्य तापमानाचे किंवा कोमट पाणी शरीरासाठी अधिक हितकारक मानले जाते. व्यायामानंतर किंवा उन्हातून आल्यावर काही वेळ थांबून पाणी पिणे आणि दिवसभर पुरेसे पाणी घेण्याची सवय ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

फ्रिजमधील थंड पाणी पिताय? सावधान! आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम, तज्ज्ञांचा इशारा
डी-टॅन म्हणजे काय? त्वचेवरील टॅन कमी करण्यासाठी किती फायदेशीर, जाणून घ्या माहिती

(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in