परफेक्ट मेकअपसाठी फाऊंडेशन कसं लावायचं? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

मेकअप परफेक्ट दिसावा यासाठी फाऊंडेशन लावताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
परफेक्ट मेकअपसाठी फाऊंडेशन कसं लावायचं? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
(Photo-Yandex)
Published on

मेकअप चांगला होण्यासाठी योग्य फाऊंडेशन लावणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र अनेकदा घाईत किंवा योग्य माहितीअभावी काही सामान्य चुका केल्या जातात आणि त्यामुळे चेहरा पॅची किंवा ऑईली दिसू शकतो. मेकअप परफेक्ट दिसावा यासाठी फाऊंडेशन लावताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

परफेक्ट मेकअपसाठी फाऊंडेशन कसं लावायचं? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
"ही आमची दुसरी सुरुवात…"; अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि तनुज गोवलकर अडकले विवाहबंधनात; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव, पाहा Photo's

सर्वात पहिली चूक म्हणजे त्वचेच्या प्रकारानुसार फाऊंडेशन न निवडणे. कोरडी, तेलकट किंवा मिश्र त्वचा यानुसार फाऊंडेशनचे वेगवेगळे फॉर्म्युला उपलब्ध असतात. चुकीचा शेड निवडल्यास चेहरा आणि मान यांचा रंग वेगळा दिसतो, त्यामुळे शेड नेहमी नैसर्गिक प्रकाशात तपासावा.

परफेक्ट मेकअपसाठी फाऊंडेशन कसं लावायचं? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
जयपूरमधील लग्नसोहळ्यात पर्सची चोरी; ४ लाखांची रोकड आणि दागिने लंपास, आरोपीचा शोध सुरू; CCTV फुटेज व्हायरल

दुसरी चूक म्हणजे त्वचा मेकअपसाठी सेट न करता थेट फाऊंडेशन लावणे. मॉइश्चरायझर आणि प्रायमर न वापरल्यास मेकअप नीट बसत नाही. त्यामुळे मेकअप करण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून पुसून घ्यावा. त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावावे. ते सेट झाल्यावर प्रायमर लावावा आणि नंतर मुख्य मेकअपला सुरुवात करावी.

परफेक्ट मेकअपसाठी फाऊंडेशन कसं लावायचं? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Mumbai : वेस्टर्न रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा; AC लोकलच्या फेऱ्या वाढणार, १९ फेब्रुवारीपासून सेवा सुरु

तिसरी मोठी चूक म्हणजे जास्त प्रमाणात फाऊंडेशन वापरणे. हलक्या थरात फाऊंडेशन लावून ते व्यवस्थित ब्लेंड करणे महत्त्वाचे आहे. तसेच फक्त चेहऱ्यावरच फाऊंडेशन लावून मान आणि गळा ब्लेंड न केल्यास लूक अपूर्ण दिसतो.

परफेक्ट मेकअपसाठी फाऊंडेशन कसं लावायचं? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
सकाळच्या नाश्त्यासाठी सोपा पर्याय; घरातला ब्रेड वापरून करा झटपट उपमा, वाचा रेसिपी

शेवटी हलका कॉम्पॅक्ट किंवा सेटिंग पावडर वापरून मेकअप सेट केल्यास तो अधिक वेळ टिकतो. या चुका टाळल्यास तुमचा मेकअप अधिक नैसर्गिक आणि आकर्षक दिसेल.

logo
marathi.freepressjournal.in