संग्रहित छायाचित्र
लाईफस्टाईल

दाट, मुलायम आणि चमकदार केसांसाठी स्वयंपाक घरातील 'या' तीन गोष्टी वापरा; लगेच जाणवेल फरक

आपले केस दाट, मुलायम आणि चमकदार असावे, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, आजची जीवनशैली, धावपळीचं जगणं यामुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. दाट, मुलायम आणि चमकदार केसांसाठी तुम्ही अनेक प्रकारचे प्रयत्न करता. मात्र, तरीही हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात. तर तुम्हाला स्वयंपाक घरातील कांदा, लसूण आणि मोहरीचं तेल या तीन गोष्टी वापरून पाहायलाच हव्या. केसांसाठी कसे ठरते उपयुक्त ते पाहा.

Kkhushi Niramish

आपले केस दाट, मुलायम आणि चमकदार असावे, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, आजची जीवनशैली, धावपळीचं जगणं यामुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. दाट, मुलायम आणि चमकदार केसांसाठी तुम्ही अनेक प्रकारचे प्रयत्न करता. मात्र, तरीही हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात. तर तुम्हाला स्वयंपाक घरातील कांदा, लसूण आणि मोहरीचं तेल या तीन गोष्टी वापरून पाहायलाच हव्या. केसांसाठी कसे ठरते उपयुक्त ते पाहा.

कांद्याचा रस

कांदा हा केसांसाठी अतिशय उत्तम असतो. कांद्यामध्ये व्हिटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट हे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ते केसांच्या समस्येवर प्रभावी पणे कार्य करतात. यासाठी तुम्हाला कांद्याचा रस आठवड्यातून तीन वेळा केसांना चोळायचा आहे. यामुळे केसांच्या त्वचेला चिकटून राहणारा डँड्रफ निघून जाईल. परिणामी तुमचे केस गळणे बंद होईल. किमान ९० दिवस आठवड्यातून तीन वेळा हा नियमितपणे कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावल्यास केस छान दाट होतील.

लसूण

लसूण हे वेगवेगळे व्हिटामिन्स, खनिजे, पोषक तत्वांनी समृद्ध आहे. लसणात सल्फर आणि अॅलिसिन हे दोन शक्तिशाली घटक असतात जे केसांना अनेक प्रकारचे फायदे देतात. अनेक जण केसांची काळजी घेण्यासाठी लसणाचे खास तेल तयार करतात. बाजारातही असे तेल उपलब्ध असते किंवा तुम्ही ते घरच्या घरीही तयार करू शकता. तसेच तुम्हाला तेल तयार करायचे नसेल तर लसणाच्या पाकळ्या तेलात उकळून हे तेल केसाच्या मुळाशी लावल्यास केसांसंबंधित सर्व आजार दूर होतात. लसणातील सल्फर आणि सेलेनियम केसांच्या शाफ्टला मजबूत करते. त्यामुळे केस गळणे कमी होतात. त्यामुळे केसांची छान वाढ होते. केस मुलायम आणि चमकदार होतात.

मोहरीचं तेल आणि लसूण

मोहरीचं तेल आणि लसूण ही अशी जोडी आहे जी केसांच्या सर्व समस्या अगदी मुळापासून संपवते. मोहरीच्या तेलात तुम्ही लसणाच्या पाकळ्या उकळून घ्या. हे तेल कोमट झाल्यावर याने केसांच्या मुळांना मालीश करा. यामुळे केसांची मुळे मजबूत होतील. केस तुटणे, केस गळणे बंद होतील.

विशिष्ट जागी केस पातळ झाल्यास...

अनेक वेळा एकाच पद्धतीचा भांग पाडल्याने विशिष्ट जागी केस पातळ होतात. अशावेळ लसूण खूप उपयोगी पडू शकतो. लसणाचे दोन छोटे तुकडे करा. हे तुकडे मोहरीच्या तेला बुडवून त्याने केस पातळ झालेल्या जागेवर चोळा. टक्कल पडणे किंवा चाई लागण्याच्या समस्येवरही हे उपयुक्त आहे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश