पिंपल्समुळे वैतागलात? सकाळी रिकाम्या पोटी करा 'हा' घरगुती उपाय; त्वचा दिसेल क्लिअर 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

पिंपल्समुळे वैतागलात? सकाळी रिकाम्या पोटी करा 'हा' घरगुती उपाय; त्वचा दिसेल क्लिअर

शरीरातील वाढलेली उष्णता, इन्फ्लेमेशन आणि रक्तातील अशुद्धता यामुळे वारंवार ब्रेकआउट्स होऊ शकतात. शरीरात पित्त वाढल्यास...

किशोरी घायवट-उबाळे

चेहऱ्यावर वारंवार येणारे पिंपल्स ही अनेकांची मोठी समस्या बनली आहे. महागडी स्किनकेअर प्रॉडक्ट्स, फेसवॉश किंवा स्पॉट ट्रीटमेंट वापरूनही अनेकदा पिंपल्स पुन्हा-पुन्हा येतात. तज्ज्ञांच्या मते, यामागचे कारण केवळ त्वचेवर नसून शरीरातील अंतर्गत असंतुलन असू शकते.

न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांच्या मते, शरीरातील वाढलेली उष्णता, इन्फ्लेमेशन आणि रक्तातील अशुद्धता यामुळे वारंवार ब्रेकआउट्स होऊ शकतात. शरीरात पित्त वाढल्यास त्याचा परिणाम सर्वप्रथम त्वचेवर दिसून येतो. त्यामुळे केवळ बाहेरून उपचार करण्याऐवजी शरीर आतून डिटॉक्स करणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.

अशावेळी श्वेता शाह यांनी सांगितलेला घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतो. हा उपाय शरीराला थंडावा देण्यास, इन्फ्लेमेशन कमी करण्यास आणि त्वचा आतून निरोगी ठेवण्यास मदत करतो.

उपायासाठी लागणारे साहित्य :

  • ३ ते ४ लवंगा

  • थोडे मध

  • काही थेंब लिंबाचा रस

  • थोडीशी ताजी कडुलिंबाची पेस्ट

उपाय कसा करावा?

  • रात्री ३ ते ४ लवंगा पाण्यात भिजत ठेवा.

  • सकाळी त्या लवंगा कुस्करून घ्या.

  • त्यात मध आणि लिंबाचा रस मिसळा.

  • नंतर त्यात थोडी कडुलिंबाची पेस्ट घाला.

  • हे मिश्रण रिकाम्या पोटी सेवन करा.

हा उपाय कसा फायदेशीर ठरतो?

या मिश्रणातील प्रत्येक घटक त्वचेसाठी उपयुक्त मानला जातो. लवंगेमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. कडुलिंब रक्तशुद्धीसाठी फायदेशीर मानला जातो. तर मध आणि लिंबू शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतात.

हे मिश्रण शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करून त्वचा शांत ठेवण्यास मदत करू शकते. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासही मदत होते.

कोणते बदल जाणवू शकतात?

हा उपाय नियमितपणे केल्यास, शरीरातील उष्णता कमी होण्यास, इन्फ्लेमेशन कमी होण्यास, सक्रिय पिंपल्स शांत होण्यास तसेच त्वचा अधिक स्वच्छ आणि स्मूद दिसण्यास मदत होते.

हा उपाय करताना पुरेसे पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि जास्त तेलकट किंवा तिखट पदार्थ टाळणे गरजेचे आहे. तसेच कोणताही वैद्यकीय त्रास असल्यास किंवा गर्भवती महिलांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच हा उपाय करावा.

(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

सायबर भामट्यांनी खाते रिकामे केले? घाबरू नका; पैसे परत मिळवण्यासाठी अशी करा तक्रार

व्हिडीओ एडिटिंग येत नाही? फक्त काही टॅप्समध्ये साधा व्हिडीओ होईल सिनेमॅटिक; Google Photos चं नवं एआय फीचर लॉन्च

Palghar Landslide : तांदुळवाडी किल्ल्याजवळ दरड कोसळली; पर्यटकांसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Mumbai : 'मराठीत बोला' म्हणणाऱ्या प्रवाशाला दोन तास RPF कार्यालयात बसवून ठेवले; व्हायरल VIDEO ची रेल्वेकडून चौकशी