बाजारातून विकत आणण्याची गरज नाही; घरच्या घरी काही मिनिटांत बनवा मॅगी मसाला  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

बाजारातून विकत आणण्याची गरज नाही; घरच्या घरी काही मिनिटांत बनवा मॅगी मसाला

Maggi Masala : बाजारात मिळणाऱ्या पॅकेटमधील मॅगी मसाल्याऐवजी हा मसाला आता घरच्या घरीही तयार करता येतो.

किशोरी घायवट-उबाळे

मॅगी, नूडल्स किंवा भाजीची चव आणखी खुलवण्यासाठी वापरला जाणारा मॅगी मसाला अनेकांच्या स्वयंपाकघरातील आवडीचा घटक आहे. बाजारात मिळणाऱ्या पॅकेटमधील मॅगी मसाल्याऐवजी हा मसाला आता घरच्या घरीही तयार करता येतो. विशेष म्हणजे रोजच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या मसाल्यांपासून काही मिनिटांत हा मसाला बनवता येतो. शेफ राणा चंद्रा यांनी सोशल मीडियावर घरच्या घरी मॅगी मसाला तयार करण्याची सोपी रेसिपी शेअर केली आहे.

मसाले भाजून घ्या

सर्वप्रथम एका पॅनमध्ये वेलची, काळी मिरी, धणे, तमालपत्र, जिरे, बडीशेप आणि अख्ख्या लाल मिरच्या घ्या. हे सर्व मसाले मंद आचेवर काही सेकंद कोरडे भाजून घ्या. मसाल्यांमधील ओलावा कमी होण्यास या प्रक्रियेमुळे मदत होते. त्यामुळे तयार मसाला अधिक काळ टिकण्यास मदत होऊ शकते. मसाले भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्या.

सर्व मसाले एकत्र करून वाटा

भाजलेले आणि थंड झालेले मसाले मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यात लाल तिखट, हळद, मीठ, लसूण पावडर, कांदा पावडर आणि व्हेजिटेरियन अरोमॅटिक पावडर घाला. हे सर्व मिश्रण बारीक वाटून त्याची एकसारखी पावडर तयार करा.

हवाबंद डब्यात साठवा

तयार झालेला मसाला स्वच्छ आणि हवाबंद डब्यात भरून ठेवा. मसाल्यात ओलावा जाऊ नये याची काळजी घ्या. योग्य प्रकारे साठवल्यास त्याची चव आणि सुगंध टिकवून ठेवण्यास मदत होते.

मॅगीपुरताच मर्यादित नाही

हा घरगुती मसाला केवळ मॅगी किंवा नूडल्ससाठीच नव्हे, तर भाजी, करी, ड्राय व्हेजिटेबल डिशेस आणि इतर पदार्थांची चव वाढवण्यासाठीही वापरता येतो. त्यामुळे एकदा तयार करून ठेवला तर गरजेनुसार स्वयंपाकात त्याचा वापर करता येईल.

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

२५ सेकंदात घराबाहेरून विद्यार्थिनीला उचललं? अपहरण प्रकरणाला आता वेगळंच वळण; तरुणीने स्वतःच व्हिडिओद्वारे केला खुलासा

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट