Pinterest
लाईफस्टाईल

Jwar Dosa Recipe: नाश्त्यासाठी बनवा ज्वारीच्या पिठाचा चविष्ट डोसा, वजन कमी करण्यासाठीही आहे उत्तम

Healthy Breakfast Recipe: नेहमीचा डोसा खाऊन कंटाळा आला असेल आणि तुम्ही हेल्दी रेसिपीच्या शोधात असाल तर ज्वारीच्या पिठाचा डोसा हा एक उत्तम पर्याय आहे.

Tejashree Gaikwad

Jwari Dosa Recipe: अनेकजण आता हेल्दी लाईफस्टाईलकडे वळले आहेत. अनेकजण वजन कमी (weight loss) करण्याच्या मागे आहेत. यासाठी साहजिकच व्यायामासोबत ते हेल्दी अन्न (healthy Breakfast) खाण्याच्या ट्राय करत आहेत. अशावेळी नाश्त्यासाठी काय करायचं हा प्रश्न पडतोच. नाश्त्यात साऊथ इंडियन पदार्थ खायला कोणाला आवडत नाही. डोसा, उत्तपा, इडली असे पदार्थ रोज दिले तर काहीजण खाऊ शकतात. पण रेगुलर चवीचे हे पदार्थ खाऊन तोच तोच पणा येतो. अशावेळी तुम्ही नाश्त्यासाठी ज्वारीचा डोसा बनवू शकता. हा वजन कमी करण्यासाठीसुद्धा प्रभावीपणे काम करतो. हा कुरकुरीत आणि जाळीदार डोसा नारळाच्या किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत खाऊ शकतो. नाश्त्यात एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, बनवायला खूप सोपी आहे. चला जाणून घेऊया ज्वारीच्या पिठाचा डोसा कसा बनवायचा.

लागणारे साहित्य

दीड कप ज्वारीचे पीठ, सोबत मीठ, द्रावण तयार करण्यासाठी ४ वाट्या पाणी, १ बारीक चिरलेला कांदा, थोडी चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, २ हिरव्या मिरच्या चिरलेल्या, अर्धा चमचा गूळ, काळी मिरी चवीनुसार आणि तेल.

जाणून घ्या कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात ज्वारीचे पीठ घ्या आणि त्यात मीठ, पाणी घालून एक द्रावण तयार करून घ्या. हे मिश्रण छान फेटून घ्या म्हणजे त्यात गुठळ्या राहणार नाहीत. आता त्यात कांदा, चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, जिरे आणि काळी मिरी घाला.

  • तयार केलेले पिठ अंदाजे १० मिनिटे बाजूला ठेवा. लक्षात ठेवा डोसा कुरकुरीत करायचा असेल तर त्याचे पीठ पातळ असायला हवे. आता तवा गरम करून त्यावर पीठ घाला.

  • आता डोस्यावर १ चमचा तेल घाला आणि कुरकुरीत होईपर्यंत २-३ मिनिटे शिजू द्या. डोसा जाळीदार बनवण्यासाठी एकाच वेळी जास्त पिठ पसरवू नका आणि सेट त्याला करण्याचा प्रयत्न करू नका.

  • डोसा गोल्डन ब्राऊन रंगाचा झाला की, तव्यावरून काढून घ्या.

  • हा तयार ज्वारी डोसा हिरवी चटणी किंवा नारळ आणि शेंगदाणा चटणीबरोबर सर्व्ह करा.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती