छायाचित्र : कॅनव्हा
लाईफस्टाईल

घरी केलेले मंच्युरियन दगडासारखे होतायत? 'या' सोप्या ट्रिक्स फॉलो करा आणि बनवा परफेक्ट मंच्युरियन

"हॉटेलमध्ये मिळतात तसे घरी केलेले मंच्युरियन दगडासारखे होतायत? घरी का जमत नाहीत?" हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल, तर काळजी करू नका. योग्य भाज्या, अचूक मिश्रण आणि काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या, तर घरच्याघरी रेस्टॉरंट-स्टाईल मऊ, घरी केलेले मंच्युरियन दगडासारखे होतायत? नक्की जमू शकतात.

Mayuri Gawade

कोबी, गाजर आणि शिमला मिरची घरी असतील, तर मंच्युरियन करायचा विचार हमखास डोक्यात येतो. पण अनेकदा घरी केलेले मंच्युरियन बाहेरून कडक, आतून कोरडे आणि थोड्याच वेळात दगडासारखे घट्ट होतात. "हॉटेलमध्ये मिळतात तसे मंच्युरियन घरी का जमत नाहीत?" हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल, तर काळजी करू नका. योग्य भाज्या, अचूक मिश्रण आणि काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या, तर घरच्याघरी रेस्टॉरंट-स्टाईल मऊ, मंच्युरियन नक्की जमू शकतात.

चला तर मग जाणून घेऊ परफेक्ट मंच्युरियन रेसिपी...

साहित्य :

  • किसलेली कोबी - १ कप

  • किसलेले गाजर - ½ कप

  • बारीक चिरलेली शिमला मिरची - ¼ कप

  • मैदा - ३ टेबलस्पून

  • कॉर्नफ्लोअर - २ टेबलस्पून

  • आले-लसूण पेस्ट - १ टीस्पून

  • सोया सॉस - १ टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • मिरी पावडर - ½ टीस्पून

  • तेल - तळण्यासाठी

कृती :

किसलेल्या भाज्या एका कपड्यात घेऊन घट्ट दाबा आणि त्यातील सगळं पाणी काढून टाका. दुसरीकडे भाज्यांमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, मिरी, आले-लसूण पेस्ट आणि थोडा सोया सॉस घालून मिश्रण तयार करा. पाणी अजिबात घालू नका. हाताला थोडं तेल लावून मध्यम आकाराचे गोळे वळा. कढईत मध्यम आचेवर तेल गरम करून गोळे सोनेरी रंगावर तळा. हे मंच्युरियन ड्राय किंवा ग्रेव्ही दोन्ही प्रकारात वापरता येतात.

मंच्युरियन मऊ राहण्यासाठी ६ खास टिप्स

१. भाज्यांचं पाणी पूर्ण काढा
पाणी राहिलं तर गोळे तुटतात आणि तेल जास्त शोषतात.

२. मैदा-कॉर्नफ्लोअरचं प्रमाण अचूक ठेवा
जास्त मैदा घातल्याने मंच्युरियन कडक होतात.

३. पाणी न घालता भाज्यांच्या ओलाव्यावर मिश्रण मळा
यामुळे गोळे हलके आणि मऊ राहतात.

४. मध्यम आचेवरच तळा
जास्त आचेवर तळल्यास बाहेरून कडक, आतून कच्चे राहतात.

५. ताजेच तळून लगेच सॉसमध्ये घाला
खूप वेळ ठेवले तर मंच्युरियन घट्ट होतात.

६. थोडा कॉर्नफ्लोअर सॉसमध्येही वापरा
ग्रेव्हीमध्ये मिसळल्यावर मंच्युरियन जास्त रसाळ लागतात.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग