नाश्त्यात काहीतरी हेल्दी हवंय? घरीच बनवा प्रोटीनयुक्त चविष्ट मशरूम टोस्ट

मशरूम टोस्ट हा असा एक सोपा पदार्थ आहे, जो बनवायला कमी वेळ लागतो आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो. प्रोटीनने भरपूर असलेले मशरूम लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीने या रेसिपीत वापरले जातात.
मशरूम टोस्ट
मशरूम टोस्ट
Published on

संध्याकाळ झाली की भूक लागतेच, आणि मग लगेच बाहेरच्या तिखट-तेलकट पदार्थांकडे हात जातो. पण रोज समोसा, वडापाव किंवा चाट खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही. अशावेळी घरीच झटपट, हलका आणि पौष्टिक नाश्ता तयार केला तर तो अधिक फायदेशीर ठरतो.
मशरूम टोस्ट हा असा एक सोपा पदार्थ आहे, जो बनवायला कमी वेळ लागतो आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो. प्रोटीनने भरपूर असलेले मशरूम लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीने या रेसिपीत वापरले जातात.

मशरूम टोस्ट
कांदे पोहे खाऊन कंटाळलात ? ट्राय करा पोह्यांचे ७ भन्नाट प्रकार जे नाश्त्याची चवच बदलतील

साहित्य

  • मशरूम

  • ब्रेड

  • कांदा

  • बटर

  • लसूण पाकळ्या

  • काळीमिरी पावडर

  • चिली फ्लेक्स

  • कोथिंबीर

  • मीठ

  • हिरव्या मिरचीचे तुकडे

  • किसलेले चीज

कृती

मशरूम टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये बटर घालून ते मध्यम आचेवर गरम करा. बटर वितळल्यानंतर त्यात बारीक चिरलेली लसूण आणि कांदा घालून छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेले मशरूम कढईत घालून नीट परता. मशरूममधील पाणी पूर्णपणे आटून जाईपर्यंत आणि मिश्रण कोरडे होईपर्यंत शिजवणे महत्त्वाचे आहे.

मशरूम टोस्ट
Aloo Tikki Recipe : चटपटीत आलू टिक्की! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट स्नॅक

मशरूम शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर, चिली फ्लेक्स आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून सर्व साहित्य एकत्र मिक्स करा. दुसरीकडे तवा गरम करून ब्रेडचे स्लाइस हलकेसे टोस्ट करून घ्या. टोस्ट केलेल्या ब्रेडवर तयार मशरूमचे सारण समान प्रमाणात पसरवा. त्यावर किसलेले चीज आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा तव्यावर किंवा पॅनमध्ये ठेवून हलके टोस्ट करा. चीज वितळले की गरमागरम मशरूम टोस्ट सर्व्ह करण्यासाठी तयार होतो.

उपयुक्त टिप्स

  • अधिक हेल्दी पर्यायासाठी मैदा ब्रेडऐवजी ब्राउन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड वापरू शकता.

  • मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची कमी करून चिली फ्लेक्सही वगळू शकता.

logo
marathi.freepressjournal.in