ड्रायक्लिनिंगचा खर्च वाचवा! सिल्क आणि बनारसी साडीवरील डाग 'असे' करा स्वच्छ 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

ड्रायक्लिनिंगचा खर्च वाचवा! सिल्क आणि बनारसी साडीवरील डाग 'असे' करा स्वच्छ

सिल्क आणि बनारसी साडीवरील डाग ड्रायक्लिनिंगशिवाय कसे कमी करता येतील? माईल्ड शॅम्पू, कॉर्नस्टार्च आणि व्हाईट व्हिनेगरच्या मदतीने साडीची चमक टिकवून ठेवण्याचे सोपे घरगुती उपाय जाणून घ्या.

Mayuri Gawade

लग्नसमारंभ, सण-उत्सव किंवा खास प्रसंगी महिलांची पहिली पसंती अनेकदा सिल्क आणि बनारसी साड्यांना असते. या साड्या जितक्या आकर्षक दिसतात, तितकीच त्यांची काळजी घेणेही महत्त्वाचे असते. खाण्यापिण्याचे डाग लागल्यानंतर अनेकजणी थेट ड्रायक्लिनिंगचा पर्याय निवडतात. मात्र, काही घरगुती उपायांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास किरकोळ डाग कमी करण्यास मदत होऊ शकते.

साडी धुण्यासाठी माईल्ड शॅम्पूचा वापर करा

सिल्कचे कापड अतिशय नाजूक असल्यामुळे त्यावर सामान्य डिटर्जंट किंवा कडक साबण वापरणे टाळावे. त्यामुळे रंग फिका होण्याची किंवा कापडाची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता असते. त्याऐवजी बेबी शॅम्पू किंवा माईल्ड शॅम्पू वापरणे अधिक सुरक्षित मानले जाते.

तेलकट डागांसाठी कॉर्नस्टार्च ठरू शकतो उपयोगी

भाजी, तूप किंवा बटरसारखे तेलकट पदार्थ साडीवर सांडल्यास कॉर्नस्टार्च किंवा टॅल्कम पावडर वापरता येते. डाग पडलेल्या भागावर थोडी पावडर शिंपडून काही मिनिटे तसेच ठेवा. त्यामुळे अतिरिक्त तेल शोषले जाण्यास मदत होते. नंतर मऊ कापडाने ती पावडर अलगद साफ करा.

चहा-कॉफीच्या डागांसाठी व्हाईट व्हिनेगरचा पर्याय

जर साडीवर चहा, कॉफी किंवा फळांच्या रसाचे डाग पडले असतील, तर एक कप पाण्यात एक चमचा व्हाईट व्हिनेगर मिसळून त्याचे द्रावण तयार करा. कापसाच्या बोळ्याच्या मदतीने ते हलक्या हाताने डागांवर लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. हा उपाय डाग कमी करण्यासोबतच कापड मऊ ठेवण्यासही मदत करू शकतो.

साडी स्वच्छ करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • डाग पडल्यावर लगेच उपाय केल्यास परिणाम अधिक चांगले मिळू शकतात.

  • साडी जोरात घासणे टाळावे.

  • कोणताही उपाय करण्यापूर्वी साडीच्या छोट्या भागावर चाचणी करून पाहावी.

टीप : हे उपाय सामान्य माहितीसाठी आहेत. प्रत्येक कापडाची गुणवत्ता वेगळी असू शकते, त्यामुळे कोणताही उपाय करण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके