घरात वारंवार दिसतात जळमटं? कोळ्यांना न मारता घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा हे घरगुती उपाय

घरात वारंवार कोळ्यांची जळमटं दिसत आहेत? कोळ्यांना न मारता त्यांना घरापासून दूर ठेवण्यासाठी काही सोपे आणि नैसर्गिक घरगुती उपाय जाणून घ्या. घर स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त टिप्स.
घरात वारंवार दिसतात जळमटं? कोळ्यांना न मारता घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा हे सोपे घरगुती उपाय
घरात वारंवार दिसतात जळमटं? कोळ्यांना न मारता घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा हे सोपे घरगुती उपाय'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

घर कितीही स्वच्छ ठेवले, महागडं फर्निचर आणलं किंवा सुंदर सजावट केली, तरी घराच्या एखाद्या कोपऱ्यात दिसणारं कोळ्यांची जळमट संपूर्ण घराचा लुक खराब करू शकतं. विशेषतः छताचे कोपरे, कपाटांच्या मागील जागा, खिडक्यांच्या कडा किंवा अंधारे भाग हे कोळ्यांचे आवडते ठिकाण असतात. जळमटं साफ केली तरी काही दिवसांत पुन्हा त्याच ठिकाणी कोळी जाळं विणतात. त्यामुळे अनेक गृहिणींसाठी ही समस्या कायमची डोकेदुखी ठरते.

कोळ्यांना इजा न करता त्यांना घरापासून दूर ठेवण्यासाठी काही साधे आणि नैसर्गिक उपाय उपयोगी ठरू शकतात. विशेष म्हणजे यासाठी महागडी उत्पादने खरेदी करण्याची गरज नाही. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या काही वस्तूंच्या मदतीने ही समस्या कमी करता येऊ शकते.

घरात वारंवार दिसतात जळमटं? कोळ्यांना न मारता घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा हे सोपे घरगुती उपाय
Cooking Tips : मातीच्या भांड्यात शिजवलेले पदार्थ लागतात अधिक चविष्ट; पण आधी करा 'हे' काम

लिंबू पाणी स्प्रे ठरू शकतो फायदेशीर

कोळ्यांना लिंबाचा तीव्र सुगंध आवडत नाही. एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यात ताज्या लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण जिथे जिथे जळमटं तयार होतात त्या ठिकाणी फवारल्यास कोळी त्या भागापासून दूर राहू शकतात. खिडक्या आणि दरवाजांच्या कडांवर लिंबाच्या साली चोळल्यासही फायदा होतो.

लिंबूवर्गीय फळांच्या साली ठेवा

लिंबू किंवा संत्र्याच्या सुकलेल्या साली खिडक्यांजवळ, कपाटांच्या कोपऱ्यात किंवा जळमटं होणाऱ्या भागात ठेवल्यास कोळी त्या जागेपासून दूर राहण्याची शक्यता असते.

व्हाईट व्हिनेगरचा स्प्रे

पाणी आणि व्हाईट व्हिनेगर समप्रमाणात मिसळून तयार केलेला स्प्रे कोळी वारंवार दिसणाऱ्या ठिकाणी वापरता येतो. भिंतींचे कोपरे, स्टोअररूम किंवा कपाटांच्या मागील भागासाठी हा उपाय उपयुक्त ठरू शकतो.

घरात वारंवार दिसतात जळमटं? कोळ्यांना न मारता घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा हे सोपे घरगुती उपाय
संध्याकाळी जंकफूड खाण्याची सवय सोडा, ५ मिनिटांत तयार होणारे 'हे' ६ हेल्दी स्नॅक्स नक्की ट्राय करा

पुदिन्याचे तेल

पुदिन्याचा वास कोळ्यांना सहसा पसंत नसल्याचं मानलं जातं. पाण्यात काही थेंब पुदिन्याचे तेल मिसळून तयार केलेला स्प्रे घरातील कोपरे, खिडक्या आणि कपाटांच्या आसपास फवारू शकता. यामुळे कोळी कमी होण्यास मदत होऊ शकते.

लवंग आणि दालचिनीचा सुगंध

लवंग तसेच दालचिनीचा वास अनेक कीटकांना दूर ठेवण्यास मदत करतो. घरातील कोपऱ्यांमध्ये लवंग ठेवू शकता किंवा दालचिनीच्या तेलाचा हलका स्प्रे वापरू शकता.

जळमटं साफ करण्याची योग्य पद्धत

जळमटं काढताना लांब दांड्याचा झाडू किंवा मायक्रोफायबर डस्टर वापरणे सोयीचे ठरते. घरात व्हॅक्यूम क्लिनर असल्यास जळमटं आणि त्यामधील अंडी सहज साफ करता येतात.

झाडू किंवा डस्टरवर काही थेंब निलगिरीचे तेल शिंपडून साफसफाई केल्यास कोळ्यांना त्या जागी पुन्हा जाळं विणण्यापासून परावृत्त करता येऊ शकतं.

घरात वारंवार दिसतात जळमटं? कोळ्यांना न मारता घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा हे सोपे घरगुती उपाय
डब्यातल्या पोळ्या घामट किंवा ओलसर होतात? 'या' ३ सोप्या ट्रिक्सने उन्हाळ्यातही राहतील मऊ आणि ताज्या!

जळमटं काढल्यानंतर त्या भागावर कोमट पाणी आणि व्हिनेगरचे मिश्रण फवारून स्वच्छ कापडाने पुसून घ्या. त्यानंतर पुदिन्याच्या तेलाचा स्प्रे वापरल्यास त्या भागाची स्वच्छता अधिक काळ टिकून राहू शकते.

लक्षात ठेवा...

घरातील कोपरे, खिडक्यांच्या कडा आणि कपाटांच्या मागील जागांची नियमित स्वच्छता केल्यास जळमटं तयार होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. नैसर्गिक उपायांचा सातत्याने वापर केल्यास कोळ्यांपासून सुटका मिळवणं अधिक सोपं होऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in