संध्याकाळी जंकफूड खाण्याची सवय सोडा, ५ मिनिटांत तयार होणारे 'हे' ६ हेल्दी स्नॅक्स नक्की ट्राय करा

संध्याकाळी चहासोबत काहीतरी खमंग खाण्याची इच्छा होते? वेफर्स, बिस्किटे किंवा जंकफूडऐवजी घरच्या घरी ५ मिनिटांत तयार होणारे हे ६ हेल्दी स्नॅक्स ट्राय करा. चव, पोषण आणि पोटभरपणा तिन्ही गोष्टी एकाच वेळी मिळतील.
संध्याकाळी जंकफूड खाण्याची सवय सोडा, ५ मिनिटांत तयार होणारे 'हे' ६ हेल्दी स्नॅक्स नक्की ट्राय करा
Published on: 

संध्याकाळची वेळ झाली की चहासोबत काहीतरी चटपटीत, कुरकुरीत आणि खमंग खाण्याची इच्छा अनेकांना होते. मात्र अशावेळी बिस्किटे, वेफर्स किंवा इतर जंकफूड खाल्ले जाते. यामुळे पोट तर भरते, पण शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. अशा वेळी घरच्या घरी काही मिनिटांत तयार होणारे हलके, चविष्ट आणि पौष्टिक स्नॅक्स उत्तम पर्याय ठरू शकतात.

विशेष म्हणजे हे पदार्थ ऑफिसच्या डब्यात नेण्यासाठीही सोयीचे असून मधल्या वेळची भूक भागवण्यास मदत करतात. जाणून घेऊया असेच काही झटपट तयार होणारे हेल्दी स्नॅक्स...

१. लाईट चिवडा

भाजलेले पोहे, शेंगदाणे आणि हलके मसाले वापरून तयार केलेला लाईट चिवडा हा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. एकदा करून ठेवल्यास तो अनेक दिवस टिकतो आणि चहासोबतही छान लागतो.

२. मसाला मखाणा

सध्या मसाला मखाणा हा हेल्दी स्नॅक्सच्या यादीतील लोकप्रिय पर्याय बनला आहे. तुपात किंवा कोरडे भाजलेले मखाणे कुरकुरीत होतात. त्यावर मीठ, मिरपूड, चाट मसाला किंवा तिखट घातल्यास त्याची चव आणखी वाढते. मखाण्यात कॅल्शियम आणि प्रथिनेही चांगल्या प्रमाणात असतात.

संध्याकाळी जंकफूड खाण्याची सवय सोडा, ५ मिनिटांत तयार होणारे 'हे' ६ हेल्दी स्नॅक्स नक्की ट्राय करा
Breakfast Recipe : सकाळच्या घाईत नाश्ता स्किप करू नका; ५ मिनिटांत तयार करा ही पौष्टिक स्मूदी

३. कॉर्न सॅलड

उकडलेले स्वीट कॉर्न, कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर आणि लिंबाचा रस वापरून काही मिनिटांत तयार होणारे कॉर्न सॅलड हे चव आणि पोषण यांचे उत्तम मिश्रण आहे. हलकी भूक भागवण्यासाठी हा एक चांगला पर्याय मानला जातो.

४. उकडलेल्या चण्यांची चाट

उकडलेले काळे चणे किंवा हरभरे, त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून तयार केलेली चाट पोटभरीची आणि पौष्टिक असते. संध्याकाळच्या वेळी जंकफूड खाण्यापेक्षा हा पर्याय अधिक आरोग्यदायी मानला जातो.

५. चनाचूर गरम

चटपटीत पदार्थ आवडणाऱ्यांसाठी चनाचूर गरम हा उत्तम पर्याय आहे. चनाचूरमध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चाट मसाला मिसळल्यास त्याची चव आणखी खुलते. काही मिनिटांत तयार होणारा हा पदार्थ घरच्यांनाही नक्की आवडेल.

संध्याकाळी जंकफूड खाण्याची सवय सोडा, ५ मिनिटांत तयार होणारे 'हे' ६ हेल्दी स्नॅक्स नक्की ट्राय करा
Cooking Tips : मातीच्या भांड्यात शिजवलेले पदार्थ लागतात अधिक चविष्ट; पण आधी करा 'हे' काम

६. शेंगदाणे-फुटाण्यांचे मिक्स

भाजलेले शेंगदाणे आणि फुटाणे एकत्र करून तयार होणारा हा साधा पण पौष्टिक नाश्ता आहे. यामधून शरीराला प्रथिने आणि ऊर्जा मिळते. कमी खर्चात तयार होणारा हा पदार्थ मधल्या वेळच्या भुकेवर उत्तम उपाय ठरतो.

जंकफूडऐवजी हेल्दी पर्याय निवडा

संध्याकाळच्या वेळी वारंवार जंकफूड खाण्याऐवजी घरच्या घरी सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांपासून तयार केलेले हे स्नॅक्स निवडल्यास चव आणि आरोग्य यांचा उत्तम समतोल साधता येतो. शिवाय हे पदार्थ कमी वेळात तयार होत असल्याने व्यस्त दिनचर्येतही सहज बनवता येतात.