लाईफस्टाईल

कांदा आणि लसूण एकत्र ठेवल्याने लवकर कुजतात; 'या' सोप्या स्टोरेज टिप्स वापरा; दीर्घकाळ टिकतील

कांदा आणि लसूण एकत्र साठवल्याने त्यांची चव बदलते, ते लवकर खराब होतात आणि वापरण्याआधीच कुजण्याची वेळ येते. महत्वाचे म्हणजे याचा परिणाम फक्त पदार्थांच्या चवीवरच नाही, तर आरोग्यावरही होऊ शकतो. त्यामुळे ही चूक का टाळावी, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

Mayuri Gawade

घरात बाजारातून आणलेला कांदा आणि लसूण कुठे ठेवायचा, याचा फारसा विचार केला जात नाही. जागा वाचवण्यासाठी किंवा सवयीने अनेकजण दोन्ही एकाच टोपलीत, पिशवीत किंवा डब्यात ठेवतात. मात्र हीच सवय मोठं नुकसान करू शकते. कांदा आणि लसूण एकत्र साठवल्याने त्यांची चव बदलते, ते लवकर खराब होतात आणि वापरण्याआधीच कुजण्याची वेळ येते. महत्वाचे म्हणजे याचा परिणाम फक्त पदार्थांच्या चवीवरच नाही, तर आरोग्यावरही होऊ शकतो. त्यामुळे ही चूक का टाळावी, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

कांद्याचा इथिलीन वायू ठरतो लसणासाठी घातक

कांद्यामधून इथिलीन नावाचा वायू बाहेर पडतो. हा वायू लसूण आणि कांदा एकत्र ठेवल्यास थेट लसणावर परिणाम करतो. त्याचबरोबर दोन्हीमधील आर्द्रतेचा परस्पर परिणाम होऊन लसूण लवकर मऊ पडतो. काही दिवसांतच त्यावर बुरशी वाढू लागते, हिरवे कोंब फुटतात आणि लसूण खराब होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते.

लसणाची चव आणि वास बदलतो

कांद्याच्या प्रभावामुळे लसूण केवळ बाहेरूनच नाही तर त्याची चव आणि वासही बदलतो. लसूण अधिक तिखट, कडू आणि उग्र वासाचा होतो. काही वेळा त्यातून दुर्गंधी येऊ लागते. असा लसूण वापरल्यास डाळी, उसळी, भाज्या किंवा चटण्यांची चव पूर्णपणे बिघडू शकते.

कांद्यालाही बसतो फटका

हा त्रास फक्त लसणापुरताच मर्यादित राहत नाही. लसणाचा तीव्र वास कांद्यामध्ये मुरतो, त्यामुळे कांद्याची नैसर्गिक चव बदलते. कांदे लवकर मऊ पडतात, सोलताना आतून काळपट किंवा ओलसर दिसतात आणि काही वेळा आतून कुजायला सुरुवात होते.

कांदा आणि लसूण यांची साठवणूक करण्याची गरज वेगवेगळी असते.

  • लसूण : कोरडी, थंड आणि चांगली हवेशीर जागा आवश्यक

  • कांदा : खोलीच्या तापमानात, सौम्य आर्द्रतेत आणि अंधारात ठेवणं योग्य

एकाच ठिकाणी ठेवल्यास योग्य हवा आणि तापमान न मिळाल्यामुळे दोघांचीही शेल्फ लाइफ मोठ्या प्रमाणात कमी होते.

योग्य साठवणुकीसाठी काय करावे?

कांदा आणि लसूण जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी हे सोपे उपाय करा -

  • कांदा आणि लसूण वेगवेगळ्या जाळीच्या टोपल्यांत ठेवा

  • प्लास्टिक पिशव्या किंवा बंद डबे वापरणं टाळा

  • चांगल्या हवेशीर, कोरड्या आणि सावलीच्या जागेत साठवा

  • कांदा आणि लसूण यांच्यात किमान १ ते २ फूट अंतर ठेवा

  • भिजलेला कांदा किंवा लसूण साठवू नका

  • फ्रिजमध्ये ठेवणं टाळा

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा पावसाचा जोर! 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून यलो-ऑरेंज अलर्ट

CJP Chalo Sansad March : जंतरमंतरवरील आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; दिल्लीत कडेकोट बंदोबस्त, Video

आता वेटिंगचं नो टेन्शन! IRCTC च्या AI फीचर्समुळे रेल्वे तिकीट होणार मिनिटांत बुक; जाणून घ्या सीक्रेट ट्रिक

डेंग्यूची भीती आता कमी होणार? भारतात पहिली QDENGA लस; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

'मी मॅन-हेटर आहे'; 'इंडियाज गॉट लेटेंट'मधील वक्तव्यानंतर शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई? जाणून घ्या नेमकं प्रकरण