'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Independence Day 2026: ऑफिसमध्ये स्टायलिश अन् प्रोफेशनल दिसायचंय? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स

जड पारंपरिक कपड्यांऐवजी आरामदायी, एलिगंट आणि ऑफिससाठी योग्य आऊटफिटची निवड करा.

किशोरी घायवट-उबाळे

१५ ऑगस्टला अनेक कार्यालयांमध्ये ध्वजारोहण आणि स्वातंत्र्यदिनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अशावेळी स्टायलिश दिसण्यासोबतच प्रोफेशनल लूकही तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे जड पारंपरिक कपड्यांऐवजी आरामदायी, एलिगंट आणि ऑफिससाठी योग्य आऊटफिटची निवड करा. जाणून घेऊया Independence Day 2026 निमित्त महिलांनी आणि पुरुषांनी कोणते फॅशन पर्याय निवडावेत.

महिलांसाठी फॅशन आयडिया

  • साधा कॉटन कुर्ता सेट

    ऑफ-व्हाईट, फिकट केशरी किंवा बॉटल ग्रीन रंगाचा प्लेन कॉटन कुर्ता सेट ऑफिससाठी एलिगंट आणि प्रोफेशनल लूक देतो.

  • पांढरा चिकनकारी कुर्ता

    पांढऱ्या चिकनकारी कुर्त्यासोबत तिरंगी ओढणी किंवा हिरव्या पँटसह केशरी अ‍ॅक्सेसरीज वापरून आकर्षक आणि साधा लूक मिळू शकतो.

  • ट्रेंडी को-ऑर्ड सेट

    खादी किंवा कॉटन फॅब्रिकमधील सिंगल कलर को-ऑर्ड सेट्स सध्या ट्रेंडमध्ये असून ते ऑफिससाठीही योग्य पर्याय ठरतात.

पुरुषांसाठी फॅशन आयडिया

  • नेहरू जॅकेटसह कुर्ता

    पांढऱ्या किंवा आयव्हरी कुर्त्यावर पेस्टल केशरी किंवा हिरव्या रंगाचे नेहरू जॅकेट घातल्यास क्लासिक आणि प्रोफेशनल लूक मिळतो.

  • स्मार्ट कॅज्युअल लूक

    पांढरा कॉटन किंवा लिनेन शर्ट खाकी ट्राउझर्ससोबत परिधान करा. त्यावर तिरंगा बॅज किंवा पॉकेट स्क्वेअर लावून देशभक्तीचा खास टच देता येईल.

ऑफिससाठी स्टायलिंग टिप्स

  • आरामदायी फूटवेअर निवडा : फ्लॅट कोल्हापुरी, मोजरी किंवा ब्लॉक हील्स दिवसभरासाठी योग्य ठरतात.

  • दुपट्टा व्यवस्थित पिन करा : ऑफिसच्या कामात अडथळा येऊ नये म्हणून दुपट्टा खांद्यावर पिन करून ठेवा.

  • हलके दागिने वापरा : बारीक झुमके, स्टड्स किंवा पर्ल ज्वेलरी प्रोफेशनल लूकला अधिक उठाव देते.

  • मेकअप साधा ठेवा : हलका मेकअप आणि नीटनेटकी हेअरस्टाईल ऑफिस लूकसाठी अधिक योग्य ठरते.

टीप :

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने तिरंगी रंगांचा वापर करताना तो संयमित आणि आकर्षक पद्धतीने करा. त्यामुळे तुमचा लूक देशभक्तीची भावना व्यक्त करेल आणि ऑफिसच्या ड्रेस कोडलाही साजेसा ठरेल.

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी