लाईफस्टाईल

भाजणीशिवाय खुसखुशीत, खमंग थालीपीठ! नाश्त्याला झटपट तयार करा 'ही' सोपी रेसिपी

घरात भाजणी नसली तर? तरीही पोहे, ज्वारी आणि गव्हाचे पीठ वापरून तुम्ही अगदी १०-१५ मिनिटांत तयार करू शकता इन्स्टंट थालीपीठ, तेही तितकंच खमंग आणि खुसखुशीत!

Mayuri Gawade

आपल्या प्रत्येकालाच सकाळी झटपट, हेल्दी आणि चविष्ट नाश्ता हवा असतो. त्यात महाराष्ट्रीय कुटुंबात थालीपीठ हे सकाळच्या नाश्त्यात असतंच. पण घरात भाजणी नसली तर? काही हरकत नाही! पोहे, ज्वारी आणि गव्हाचे पीठ वापरून तुम्ही अगदी १०-१५ मिनिटांत तयार करू शकता इन्स्टंट थालीपीठ, तेही तितकंच खमंग आणि खुसखुशीत! चला तर मग पाहूयात ही भाजणीशिवाय झटपट बनणारी थालीपीठ रेसिपी...

साहित्य :

  • पोहे (भिजवलेले) - १ कप

  • ज्वारीचे पीठ - १/२ कप

  • गव्हाचे पीठ - १/२ कप

  • बेसन - २ टेबलस्पून

  • कांदा (बारीक चिरलेला) - १ कप

  • आलं-लसूण पेस्ट - १ टेबलस्पून

  • हिरवी मिरची पेस्ट - १ टेबलस्पून

  • पांढरे तीळ - १ टेबलस्पून

  • कोथिंबीर (बारीक चिरलेली) - २ टेबलस्पून

  • हळद - १/२ टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • तेल - २ ते ३ टेबलस्पून

  • पाणी - गरजेनुसार

कृती :

सर्वप्रथम भिजवलेले पोहे एका मोठ्या भांड्यात घेऊन हातांनी छान दाब देत मॅश करून घ्या. त्यात ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ आणि बेसन घालून मिश्रण एकत्र करा. आता या पिठात बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरचीची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट, हळद, पांढरे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून सगळं नीट मिसळा. थोडं-थोडं पाणी घालत मऊसर पण घट्ट पीठ मळा. तवा गरम करून त्यावर तेल सोडा आणि ओल्या हाताने पीठाचा गोळा घेऊन थालीपीठ पसरवा. दोन्ही बाजूंनी थोडं तेल घालत खमंग, सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. गरमागरम थालीपीठ दही, लोणी किंवा चटणीसोबत सर्व्ह करा आणि नाश्ता मस्त करून टाका!

'सिप्ला फार्मा'ला दिलासा! औषध परवाना रद्द करण्याचा निर्णय मागे; उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर FDA ची माघार

'FIR झाली तरी सत्य उघड करणारच'; सरकारी शाळेतील मुदतबाह्य अन्नावर अभिजीत दिपकेंचा इशारा, Video

मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान ब्लॉक, पश्चिम रेल्वेचा दिलासा

'हे शेवटचं आंदोलन...'; मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, सरकारला थेट इशारा

Mumbai : चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक समोर; पारंपरिक रूपाने जिंकली भाविकांची मनं