घरात पार्टी प्लॅन केलीये? मग स्नॅक्समध्ये हे पॉकेट समोसे नक्की ट्राय करा!

घरच्या घरी पार्टी करताय आणि स्नॅकमध्ये काय बनवायचं हा प्रश्न पडतोय? मग एकदा हे पॉकेट समोसे नक्की ट्राय करा. आकाराने छोटे, दिसायला वेगळे आणि खायला जबरदस्त कुरकुरीत, वरून आतमध्ये बटाट्याचं मसालेदार सारण…
घरात पार्टी प्लॅन केलीये? मग स्नॅक्समध्ये हे पॉकेट समोसे नक्की ट्राय करा!
घरात पार्टी प्लॅन केलीये? मग स्नॅक्समध्ये हे पॉकेट समोसे नक्की ट्राय करा!
Published on

घरच्या घरी पार्टी करताय आणि स्नॅकमध्ये काय बनवायचं हा प्रश्न पडतोय? मग एकदा हे पॉकेट समोसे नक्की ट्राय करा. आकाराने छोटे, दिसायला वेगळे आणि खायला जबरदस्त कुरकुरीत, वरून आतमध्ये बटाट्याचं मसालेदार सारण… हा स्नॅक सर्व्ह केला की सगळेच म्हणतील, "हे अजून मिळेल का?" चला तर मग जाणून घेऊया सोप्या आणि झटपट बनणाऱ्या पॉकेट समोशांची रेसिपी...

घरात पार्टी प्लॅन केलीये? मग स्नॅक्समध्ये हे पॉकेट समोसे नक्की ट्राय करा!
थंडीच्या दिवसांत चहाबरोबर खमंग कुरकुरीत 'पालक भजी'! आताच नोट करा सोपी रेसिपी

साहित्य

  • मैदा - २ वाट्या

  • मीठ - १/२ चमचा

  • तेल/तूप - ३ चमचे (मोहनासाठी)

  • पाणी - पीठ मळण्यासाठी

  • तेल - तळण्यासाठी

  • उकडलेले हिरवे वाटाणे - १/२ वाटी

  • कांदा - १ मोठा (बारीक चिरलेला)

  • आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट - १ चमचा

  • हळद - १/४ चमचा

  • लाल तिखट - १ चमचा

  • गरम मसाला - १/२ चमचा

  • आमचूर पावडर - १/२ चमचा (ऐच्छिक)

  • कोथिंबीर - २ चमचे

  • मीठ - चवीपुरते

  • तेल - २ चमचे (फोडणीसाठी)

घरात पार्टी प्लॅन केलीये? मग स्नॅक्समध्ये हे पॉकेट समोसे नक्की ट्राय करा!
अचानक पाहुणे आले तरी चिंता नको! बनवा रेस्टॉरंटसारखी चमचमीत व्हेज कोल्हापुरी; लगेचच नोट करून घ्या सोपी रेसिपी

कृती

सुरुवातीला मैदा, मीठ आणि तूप एकत्र मिसळून बोटांनी चुरा तयार करा. हळूहळू पाणी घालत कडकसर पीठ मळा आणि १५ मिनिटं झाकून बाजूला ठेवा.

सारणासाठी कढईत तेल गरम करून त्यात कांदा घाला. तो हलका गुलाबी झाला की आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट घालून परता. नंतर हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि आमचूर पावडर घाला. त्यावर मॅश केलेले बटाटे आणि उकडलेले वाटाणे घालून सर्व मिश्रण नीट परता. शेवटी मीठ आणि कोथिंबीर घालून सारण थंड होऊ द्या.

आता पीठाच्या छोट्या गोळ्या घेऊन मध्यम जाडीच्या पुरी लाटा. पुरीला हलका कट देऊन तीन बाजू जोडलेल्या ठेवा आणि एक बाजू उघडी ठेवा. या उघड्या बाजूने सारण भरा आणि किनारी पाण्याने चिकटवून सुंदर चौकोनी पॉकेट तयार करा.

कढईत तेल गरम करून पॉकेट समोसे मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. तळल्यानंतर कागदावर काढून जादा तेल निघू द्या… आणि गरमागरम सर्व्ह करा!

सर्व्हिंग टिप्स

  • हिरव्या चटणी आणि खजूर-इमली चटणीसोबत अप्रतिम लागतात

  • मुलांसाठी टोमॅटो केचप बेस्ट

  • चहा किंवा थंड पेयाबरोबर धमाल कॉम्बो

logo
marathi.freepressjournal.in