आता वेटिंगचं नो टेन्शन! IRCTC च्या AI फीचर्समुळे रेल्वे तिकीट होणार मिनिटांत बुक; जाणून घ्या सीक्रेट ट्रिक 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
लाईफस्टाईल

आता वेटिंगचं नो टेन्शन! IRCTC च्या AI फीचर्समुळे रेल्वे तिकीट होणार मिनिटांत बुक; जाणून घ्या सीक्रेट ट्रिक

IRCTC ने बीटा वेबसाइटवर दोन नवीन AI फीचर्स सुरू केले आहेत. लॉगिन न करताही सीट उपलब्धता पाहता येणार, तर वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता आधीच समजणार. जाणून घ्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ३ महत्त्वाच्या टिप्स.

Mayuri Gawade

रेल्वेचं तिकीट बुक करताना वेबसाइट हँग होणे, वारंवार लॉगिन करावं लागणं, सीट उपलब्धता तपासण्यात वेळ जाणं किंवा शेवटी वेटिंग तिकीट मिळणं, हा अनेक प्रवाशांचा नेहमीचाच अनुभव आहे. विशेषत: तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये काही सेकंदांचाही विलंब महागात पडतो. दरम्यान, गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांकडून आतापासूनच रेल्वे तिकिटांसाठी धडपड सुरू झाली आहे. अशा वेळी आयआरसीटीसीने आपल्या बीटा वेबसाइटवर सुरू केलेले दोन नवीन एआय फीचर्स प्रवाशांसाठी उपयुक्त ठरू शकतात. या सुविधांमुळे लॉगिन न करताही सीट उपलब्धता पाहता येणार असून, वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता देखील आधीच समजू शकणार आहे.

लॉगिन न करताही पाहता येणार सीट उपलब्धता

यापूर्वी तत्काळ बुकिंगपूर्वी आधी लॉगिन करावे लागत असे. मात्र, बुकिंग सुरू होईपर्यंत अनेकदा सेशन एक्सपायर होत असल्याने पुन्हा लॉगिन करण्यात वेळ जात असे आणि कन्फर्म तिकीट मिळण्याची संधी कमी होत असे.

आता नव्या बीटा वेबसाइटवर लॉगिन न करताच ट्रेन, उपलब्ध जागा आणि भाड्याची माहिती पाहता येणार आहे. त्यामुळे योग्य ट्रेन आणि कन्फर्म सीट दिसताच थेट लॉगिन करून बुकिंग करता येईल. यामुळे महत्त्वाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.

AI सांगणार वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता

तत्काळ बुकिंगमध्ये अनेकदा वेटिंग तिकीट मिळते. ते कन्फर्म होईल की नाही, याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम असतो. ही अडचण दूर करण्यासाठी आयआरसीटीसीने AI Prediction Tool सुरू केला आहे. हा एआय टूल जुन्या बुकिंग ट्रेंड्स आणि उपलब्ध डेटाचे विश्लेषण करून वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची किती टक्के शक्यता आहे, याचा अंदाज देतो. त्यामुळे त्याच तिकीटाची वाट पाहायची की दुसऱ्या ट्रेनचा पर्याय निवडायचा, याचा निर्णय घेणे सोपे होते.

तत्काळ तिकीट बुकिंगसाठी 'या' ३ टिप्स लक्षात ठेवा

१. Master List आधीच तयार ठेवा

बुकिंग सुरू होण्यापूर्वी आपल्या IRCTC खात्यातील My Profile > Master List मध्ये प्रवाशांची नावे, वय आणि ओळखपत्राची माहिती सेव करून ठेवा. त्यामुळे बुकिंगच्या वेळी प्रत्येक माहिती पुन्हा टाइप करण्याची गरज पडणार नाही.

२. IRCTC eWallet वापरा

नेट बँकिंग, यूपीआय किंवा कार्ड पेमेंटदरम्यान ओटीपी किंवा बँकेचा सर्व्हर उशीर करू शकतो. त्यामुळे IRCTC eWallet मध्ये आधीच पैसे भरून ठेवल्यास पेमेंट काही सेकंदांत पूर्ण होऊ शकते.

३. VIKALP पर्याय निवडायला विसरू नका

तिकीट बुक करताना VIKALP हा पर्याय निवडल्यास, तुमचे वेटिंग तिकीट कन्फर्म न झाल्यास त्याच मार्गावरील दुसऱ्या ट्रेनमध्ये रिकामी जागा उपलब्ध असल्यास रेल्वेकडून ती दिली जाऊ शकते.

एकूणच, आयआरसीटीसीच्या या नव्या एआय सुविधांमुळे तत्काळ तिकीट बुकिंगची प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होण्याची अपेक्षा आहे. विशेषत: वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता आधीच समजल्याने प्रवाशांना योग्य वेळी पर्यायी निर्णय घेणेही शक्य होणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिल्लीत ५ मजली PG इमारत जमीनदोस्त; एकाचा मृत्यू, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण अन्...

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल