लाईफस्टाईल

उन्हामुळे जीव कासावीस होतोय? ५ मिनिटांत बनवा गारगार कैरीचं सरबत

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी घरच्या घरी बनवा कैरीचं मसालेदार सरबत. पुदिना, कोथिंबीर आणि मसाल्यांसोबत तयार होणारं हे refreshing पेय केवळ ५ मिनिटांत तयार होतं.

Mayuri Gawade

उन्हाळ्याची चाहूल लागली की शरीराला सतत काहीतरी थंड, ताजेतवाने देणारं प्यावंसं वाटतं. वाढत्या तापमानामुळे अंगातला ताजेपणा कमी झाल्यासारखा जाणवतो. अशा वेळी घरच्या घरी बनवलेलं गार पेय शरीराला दिलासा देतं. कच्च्या कैरीपासून तयार होणारं मसालेदार सरबत हा त्यासाठी एक परफेक्ट पर्याय ठरू शकतो.

कैरीची आंबट-तुरट चव आणि पुदिना-कोथिंबीर- मसाल्यांचा संगम यामुळे हे सरबत केवळ स्वादिष्टच नाही, तर शरीराला थंडावा देणारं आणि पचनासाठीही फायदेशीर ठरतं. विशेष म्हणजे, हे सरबत अवघ्या ५ मिनिटांत तयार होतं.

साहित्य :

  • आंबट कैरी

  • पुदिन्याची पाने

  • कोथिंबीर

  • हिरवी मिरची

  • लिंबाचा रस

  • मीठ

  • सैंधव मीठ

  • साखर

  • जिरे

  • चाट मसाला

  • पाणी

  • बर्फ

कृती :
सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुऊन तिचा किस करा किंवा छोटे तुकडे करून घ्या. हे तुकडे मिक्सरमध्ये घालून त्यात पुदिन्याची पाने, चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाका. त्यानंतर लिंबाचा रस घालून चवीनुसार मीठ, सैंधव मीठ आणि साखर मिसळा.

आता या मिश्रणात जिरे आणि चाट मसाला घालून थोडंसं पाणी टाका आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. मिश्रण तयार झाल्यावर ते गाळून घ्या, ज्यामुळे सरबत अधिक गुळगुळीत होईल.

यानंतर गाळलेला रस एका भांड्यात काढून त्यात थोडासा कैरीचा किस, बर्फ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा. वरून चाट मसाला शिंपडून सर्व्ह करा.

खास टिप्स :

  • जास्त आंबट चव हवी असल्यास कैरीचं प्रमाण वाढवा

  • गोडपणा चवीनुसार साखर कमी-जास्त करा

  • अधिक फ्रेशनेससाठी थोडा पुदिना वरून घालू शकता

  • थंडगार चवसाठी सर्व्ह करताना बर्फ जरूर वापरा

उन्हाच्या कडकडीत दिवसांत हे कैरीचं मसालेदार सरबत केवळ जिभेलाच नाही, तर शरीरालाही दिलासा देतं. आंबट-गोड-तिखट चवीचा हा भन्नाट संगम एकदा नक्की ट्राय करा!

CJP Protest : 'अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन चालवण्याचा पोलिसांना अधिकार'; RAF च्या दारुगोळा वापराच्या नोंदी जतन करा - SC

'तुम्ही पतंजलीवर लक्ष द्या नाहीतर बंद पडेल'; रामदेव बाबांना अभिजीत दिपकेंचे प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याचे बनावट पत्र व्हायरल; PIB चा खुलासा

Mumbai : अटल सेतूवर चुकीच्या दिशेने दुचाकी चालवण्याचा स्टंट; व्हिडीओ व्हायरल होताच रायडरविरोधात FIR दाखल

तोरणमाळच्या झिपलाईनवर जीव टांगणीला! ३,५०० फूट दरीवर अडकला पर्यटक; थरार पाहून धडकी भरेल, बघा Video