उन्हाळ्यातील खास डिश! आंबट-तिखट कैरी राईस; एकदा खाऊन बघाच 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

उन्हाळ्यातील खास डिश! आंबट-तिखट कैरी राईस; एकदा खाऊन बघाच

उन्हाळ्यातील खास कैरी राईस रेसिपी जाणून घ्या. आंबट-तिखट चवीचा हा झटपट पदार्थ घरीच सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते वाचा.

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळ्यात कैरीपासून बनणारे पदार्थ खाण्याची मजाच काही वेगळी असते. आंबट, तिखट आणि हलकी चव असलेला 'कैरी राईस' (Mango Rice) हा असाच एक झटपट आणि चविष्ट पदार्थ आहे. कमी वेळात तयार होणारा हा राईस लंचबॉक्स किंवा दुपारच्या जेवणासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

साहित्य :

  • बासमती तांदूळ (शिजवलेला) - १ कप

  • मध्यम आकाराची कैरी (किसलेली) - १

  • हिरवे मटार - अर्धा कप

  • जिरे - १ टीस्पून

  • लसूण पाकळ्या - ४ ते ५

  • लाल तिखट - १ टीस्पून

  • हळद - अर्धा टीस्पून

  • आचार मसाला - १ टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • तेल - २ टेबलस्पून

कृती :

सर्वप्रथम कैरी किसून घ्या. जिरे भाजून त्यात लसूण आणि लाल तिखट घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करा. बासमती तांदूळ शिजवून फुलवून घ्या. एका पातेल्यात तेल गरम करून त्यात तयार केलेली जिरं-लसूण पेस्ट टाका आणि छान परतून घ्या. आता त्यात हिरवे मटार आणि किसलेली कैरी घालून नीट मिसळा. त्यानंतर शिजवलेला भात, आचार मसाला, हळद आणि मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करा. सर्व मिश्रण छान एकत्र झाल्यावर गरमागरम कैरी राईस सर्व्ह करा.

टिप्स :

  • गरमागरम कैरी राईस आंबा किंवा कैरीच्या चटणीसोबत सर्व्ह केल्यास चव छान लागते.

  • कैरी जास्त आंबट असल्यास तिखट आणि मीठ यांच्या प्रमाणात समतोल ठेवा.

  • आचार मसाला घातल्याने राईसला वेगळी चव येते.

  • शिजवलेला भात पूर्ण थंड झाल्यावर वापरल्यास दाणे मोकळे राहतात.

  • थोडे काजू किंवा शेंगदाणे घातल्यास चव आणि टेक्स्चर वाढते.

Nashik : कुंभमेळ्यामुळे ५० हजार कोटींच्या व्यापाराची संधी; एक लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज

Mumbai : कुत्र्याला मारहाण केली म्हणून नालासोपाऱ्यात राडा! ५० जणांच्या जमावाकडून ३० ते ३५ घरांची तोडफोड

नेपाळमध्ये दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; माऊंट एव्हरेस्टजवळ लँडिंगवेळी मोठी दुर्घटना, एका भारतीयाचा मृत्यू, थरारक Video व्हायरल

मुख्य जलवाहिनी फुटल्याने घोटभर पाण्यासाठी संघर्ष! उल्हासनगरमधील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक

Mumbai : दिवाळी नव्या घरात; बीडीडी चाळीतील ५५७ कुटुंबांना मिळणार प्रशस्त घरे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ६ नोव्हेंबरला वाटप