Summer Special : कच्च्या कैरीची चटणी; १० मिनिटांत तयार होणारी झणझणीत रेसिपी, भाकरीसोबत लागते जबरदस्त

कमी वेळात तयार होणारी आणि जेवणाची चव दुप्पट करणारी ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करू शकता. भाकरी किंवा पोळीसोबत ही चटणी अप्रतिम लागते.
Summer Special : कच्च्या कैरीची चटणी; १० मिनिटांत तयार होणारी झणझणीत रेसिपी, भाकरीसोबत लागते जबरदस्त
Summer Special : कच्च्या कैरीची चटणी; १० मिनिटांत तयार होणारी झणझणीत रेसिपी, भाकरीसोबत लागते जबरदस्त'एआय' ने बनवलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

उन्हाळा म्हटलं की, कच्च्या कैरीचे पदार्थ आठवतातच. आंबट-तिखट चवीची कैरीची चटणी ही अनेकांच्या घरी बनवली जाते. कमी वेळात तयार होणारी आणि जेवणाची चव दुप्पट करणारी ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करू शकता. भाकरी किंवा पोळीसोबत ही चटणी अप्रतिम लागते.

साहित्य :

  • कच्ची कैरी (तुकडे केलेली) - २

  • काश्मिरी लाल मिरच्या - आवडीनुसार

  • मीठ - चवीनुसार

  • गूळ - १ वाटी (तुकडे केलेले)

  • लाल तिखट - २ चमचे

  • हळद - अर्धा चमचा

  • धणे पावडर - अर्धा चमचा

  • तेल - फोडणीसाठी

Summer Special : कच्च्या कैरीची चटणी; १० मिनिटांत तयार होणारी झणझणीत रेसिपी, भाकरीसोबत लागते जबरदस्त
Sunday Special Recipe : घरीच बनवा मसालेदार स्टफ्ड पापलेट फ्राय; पाहुण्यांसाठी परफेक्ट डिश, वाचा रेसिपी

कृती :

सर्वप्रथम कच्च्या कैरीचे छोटे तुकडे करून घ्या. काश्मिरी लाल मिरच्या थोड्या वेळासाठी पाण्यात भिजत ठेवा. यानंतर मिक्सरमध्ये भिजवलेल्या मिरच्या आणि कैरीचे तुकडे घाला. त्यात मीठ आणि गूळ घालून थोडंसं जाडसर वाटून घ्या.

Summer Special : कच्च्या कैरीची चटणी; १० मिनिटांत तयार होणारी झणझणीत रेसिपी, भाकरीसोबत लागते जबरदस्त
सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मूग वडे; सोपी आणि टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा

आता या मिश्रणात लाल तिखट, हळद आणि धणे पावडर घालून सगळं नीट मिक्स करा. शेवटी कढईत तेल गरम करून फोडणी तयार करा आणि ती चटणीत घाला. चटणी हलक्या हाताने मिक्स करा. झणझणीत कैरीची चटणी तयार!

Summer Special : कच्च्या कैरीची चटणी; १० मिनिटांत तयार होणारी झणझणीत रेसिपी, भाकरीसोबत लागते जबरदस्त
Sunday Special Recipe : फिश लव्हर्ससाठी खास! मालवणी स्टाईल सुरमई करी; ट्राय करा सोपी रेसिपी

सर्व्ह कसे कराल?

ही कैरीची चटणी गरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करा. जेवणाची चव वाढवणारी ही चटणी प्रत्येकाला आवडेल.

Summer Special : कच्च्या कैरीची चटणी; १० मिनिटांत तयार होणारी झणझणीत रेसिपी, भाकरीसोबत लागते जबरदस्त
Sunday Special Recipe : अंड्यांना द्या हटके ट्विस्ट! नाश्त्याला बनवा 'चिली ऑइल एग्स'; झटपट रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

टिप्स :

  • चटणी थोडी गोड-तिखट हवी असल्यास गुळाचे प्रमाण वाढवू शकता.

  • मिरच्या जास्त वेळ भिजवल्यास चटणी अधिक मऊ आणि चविष्ट होते.

  • फोडणी देताना तेल नीट गरम झाले आहे याची खात्री करा.

  • कैरी खूप आंबट असल्यास थोडा जास्त गूळ वापरा.

Summer Special : कच्च्या कैरीची चटणी; १० मिनिटांत तयार होणारी झणझणीत रेसिपी, भाकरीसोबत लागते जबरदस्त
Chinese Dosa Recipe : डोसा तर नेहमीच खातो, पण 'चायनीज डोसा' कधी ट्राय केलाय का? घरच्या घरी बनवा हटके रेसिपी

ही रेसिपी अगदी सोपी असून कमी वेळात तयार होते, त्यामुळे उन्हाळ्यात नक्की करून पाहा.

logo
marathi.freepressjournal.in