

सकाळच्या नाश्त्यात काहीतरी गरमागरम, कुरकुरीत खायची इच्छा झाली तर 'मूग वडे' हा एकदम परफेक्ट पर्याय ठरतो. मूग डाळ आणि उडीद डाळ यांचा मिलाफ, त्यात पालक आणि मसाल्यांची चव, हे वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लागतात. चहासोबत किंवा पाहुण्यांसाठी हा स्नॅक नक्कीच सगळ्यांच्या पसंतीस उतरेल.
साहित्य :
भिजवलेली मूग डाळ - १ कप
भिजवलेली उडीद डाळ - अर्धा कप
कोथिंबीर (चिरलेली) - ३ ते ४ टेबलस्पून
लसूण (चिरलेला) - १ टेबलस्पून
हिरव्या मिरच्या (चिरलेल्या) - २
चिरलेली पालक पाने - १ कप
कांदा (स्लाइस केलेला) - १ मध्यम
हळद - अर्धा टीस्पून
लाल तिखट - दीड टीस्पून
मीठ - चवीनुसार
बेसन - दीड कप
तेल - तळण्यासाठी
हिरवी चटणी - सर्व्ह करण्यासाठी
कृती :
एका भांड्यात मूग डाळ आणि उडीद डाळ घ्या. त्यात कोथिंबीर, लसूण, मिरच्या, पालक, कांदा, हळद, लाल तिखट आणि मीठ घालून नीट मिसळा. आता त्यात बेसन घालून मिश्रण एकजीव करा. कढईत पुरेसं तेल गरम करा. हाताला पाणी लावून मिश्रणाचे छोटे गोळे घ्या आणि थोडे चपटे करा. गरम तेलात हलक्या हाताने सोडा आणि सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळा. टिश्यू पेपरवर काढून गरमागरम हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
टिप्स :
डाळ जास्त वेळ भिजवू नका, नाहीतर वडे जास्त मऊ होतील.
तेल योग्य तापमानाला गरम असणे खूप महत्त्वाचे आहे.
अधिक कुरकुरीत टेक्स्चर साठी थोडा रवा घालू शकता.
कांदा शेवटी घातल्यास वड्यांचा क्रंच टिकून राहतो.
चव वाढवण्यासाठी थोडं गरम मसाला किंवा चाट मसाला शिंपडा.