Sunday Special Recipe : कोळी स्टाईल झणझणीत अंड्याचं भरीत; एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Sunday Special Recipe : कोळी स्टाईल झणझणीत अंड्याचं भरीत; एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल

कोळी स्टाईल मसालेदार अंड्याचं भरीत घरच्या घरी कसं बनवायचं जाणून घ्या. खोबरे, हिरवी मिरची आणि खास मसाल्यामुळे तयार होणारी ही झणझणीत Egg Bharit Recipe नक्की ट्राय करा.

किशोरी घायवट-उबाळे

अंडी म्हटलं की ऑम्लेट, भुर्जी किंवा करी हे पदार्थ नेहमीचेच. पण जर तुम्हाला काहीतरी हटके, झणझणीत आणि पारंपरिक चवीचा पदार्थ ट्राय करायचा असेल तर कोळी स्टाईल मसालेदार अंड्याचं भरीत हा उत्तम पर्याय ठरू शकतो. खोबरे, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबिरीच्या खास मसाल्यामुळे या पदार्थाला भन्नाट चव येते. एकदा ही रेसिपी खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. जाणून घ्या घरच्या घरी झटपट कसं बनवायचं कोळी स्टाईल अंड्याचं भरीत.

साहित्य :

  • ६ उकडलेली अंडी

  • २ ते ३ टेबलस्पून तेल

  • अर्धा टीस्पून हळद

  • चवीनुसार मीठ

  • १ ते २ टीस्पून लिंबाचा रस

  • कोथिंबीर

हिरवी पेस्ट बनवण्यासाठी :

  • अर्धा कप खोबरे

  • २ ते ३ हिरव्या मिरच्या

  • १ इंच आले

  • ६ ते ८ लसूण पाकळ्या

  • मूठभर कोथिंबीर

  • थोडं पाणी

कृती :

उकडलेल्या अंड्यांना हलकासा कट करून त्यातील पिवळा भाग बाहेर काढा. अंड्याचा पांढरा भाग वेगळा ठेवा. मिक्सरमध्ये खोबरे, हिरवी मिरची, आले, लसूण, कोथिंबीर आणि थोडं पाणी घालून बारीक हिरवी पेस्ट तयार करा.

कढईत तेल गरम करून त्यात हळद आणि मीठ घाला. त्यात अर्धी हिरवी पेस्ट टाकून तेल सुटेपर्यंत चांगली परता. यानंतर अंड्याचा पिवळा भाग कुस्करून मसाल्यात मिसळा. त्यात लिंबाचा रस घालून मिश्रण नीट परता आणि थंड होऊ द्या. तयार मिश्रणाचे छोटे गोळे बनवून अंड्याच्या पांढऱ्या भागात भरून अंडी बंद करा.

त्याच कढईत पुन्हा थोडं तेल, हळद आणि मीठ घालून उरलेली हिरवी पेस्ट परता. तेल सुटल्यावर तयार अंडी त्यात हलक्या हाताने मिक्स करा.वरून कोथिंबीर भुरभुरा आणि गरमागरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करा.

टिप्स :

  • अधिक तिखट चव हवी असल्यास हिरव्या मिरच्यांचं प्रमाण वाढवा.

  • खोबऱ्यामुळे मसाल्याला छान क्रीमी टेक्स्चर येते, त्यामुळे ताजं खोबरं वापरा.

  • अंडी तुटू नयेत म्हणून मसाला हलक्या हाताने मिक्स करा.

  • कोळी स्टाईल फ्लेवरसाठी थोडं कोकम किंवा चिंचेचं पाणीही घालू शकता.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके